उपचार तर नाहीच, गर्भवती तनिषाला साडेपाच तास थांबवले ; तपासात धक्कादायक माहिती समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुण्यातील तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभारामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी अपडेट आता हाती आली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या चौकशीमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गर्भवती तनिषा भिसे हिला तब्बल साडेपाच तास थांबून ठेवले एवढेच नाही तर तिच्यावर उपचारही केले नाहीत ही प्रथम दर्शनी माहिती पोलिसांना सीसीटीव्ही तपासल्यानंतर प्राप्त झाली आहे.

या प्रकरणावरून दिनानाथ मंगेशकर व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला जात आहे. मात्र या प्रकरणामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कोणतीही थेट कारवाई करता येत नाही आणि म्हणूनच पुणे पोलीस ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहिणार आहेत. दीनानाथ रुग्णालय इथे घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना अहवाल सादर करावा असं या पत्रामध्ये सांगितलं जाणार आहे. रुग्णाच्या कुटुंबीय यांच्याकडून अनामत रक्कम ठेवण्याची मागणी केली होती का? याचीही चौकशी केली जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सात महिन्यांची गर्भवती असलेल्या तनिषा भिसे या महिलेला वेळेवर उपचार न दिल्यामुळे तसेच उपचारासाठी दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप भिसे हिच्या कुटुंबीयांनी केला आहे. योग्य वेळेत उपचार न दिल्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात तनिषा यांना हलवावं लागलं आणि यादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तनिषा भिसे हिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दहा लाख रुपयांची मागणी केल्यानंतर कुटुंबीय अडीच लाख रुपये देण्यास तयार होते मात्र तरी देखील उपचार करण्यास नकार दिल्याची माहिती कुटुंबीयांकडून दिली गेलीये.

समितीची स्थापना

गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यभरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तनिषा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली दोषींवर योग्य कारवाई करण्याचा आश्वासन दिले. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य शासनाकडून पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती आज म्हणजे सोमवारी आपला अहवाल सादर करणार आहे.

त्यामुळे नेमकं त्या अहवालामध्ये कोणत्या गोष्टी समोर येतात याची उत्सुकता आता लागून राहिले असून संबंधित रुग्णालयाला दोषी ठरवलं जाणार की नाही याची देखील माहिती हा अहवाल आल्यानंतर समोर येणार आहे.