Disha Salian Malvani Police Closure Report : वडिलांचं अफेअर, पैसे देऊन थकली..; दिशाच्या मृत्यूबाबत रिपोर्टमधून नवा खुलासा

Disha Salian case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली होती…. दिशावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे अशाही प्रकारचे अनेक आरोप झाले… परंतु आता मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये (Disha Salian Malvani Police Closure Report) दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी वेगळीच धक्कादायक माहिती समोर आलीय.. दिशाचे वडील सतीश सालियान यांचं बाहेर अफेअर होते… सतीश सालियान हे दिशाकडून सातत्याने पैसे घ्यायचे… वडिलांना पैसे देऊन दिशा पुरती थकली होती.. याच आर्थिक तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हंटल आहे…. यामुळे दिशाचे वडील सतीश सालियान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टनुसार, दिशाचे वडील सतीश सालियान यांचं ठाण्यातील त्यांच्या मसाले बनवण्याच्या युनिटमधील एका महिला कर्मचाऱ्यासोबत अफेअर होते. सतीश सालियन यांनी दिशाने कष्टाने कमावलेल्या पैशाचा गैरवापर करत सदर महिलेवर ते खर्च करत होते. दिशाने आपल्या जवळच्या मित्र- मैत्रिणींना हि गोष्ट सांगितली होती. या गोष्टींमुळेच तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे. दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. मालाडमधील जनकल्याण नगर येथील रीजेंट गॅलेक्सी टॉवरच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून तिचा मृत्यू झाला होता. तपासात असे दिसून आले की ज्या फ्लॅटमधून तिने उडी मारली तो फ्लॅट तिचा मंगेतर रोहन रॉयचा होता. दिशा आणि रोहन २०१४ पासून रिलेशनशिपमध्ये होते. कोरोनानंतर लग्न करण्याचे त्यांनी ठरवलं होते.

पोलीस तपासानुसार, घटनेच्या वेळी सालियनचा मंगेतर रॉय, तिचे बालपणीचे मित्र – इंद्रनील वैद्य, दीप अजमेरा, हिमांशू शिखरे आणि रेशा पडवाल यांच्यासह उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच, त्यांनी सालियनला रुग्णालयात नेले. पोलिसांनी या सर्वांचे जबाब घेतले तेव्हा त्यांनीही दिशाचा वडिलांचे बाहेर अफेअर असल्याचं सांगितलं. व्यवसाय आणि कौटुंबिक समस्यांमुळे दिशा तणावाखाली होती. ती कॉर्नरस्टोन कंपनीत सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करत होती आणि ती जे प्रोजेक्ट हॅन्डल करत होती त्यापैकी दोन प्रोजेक्ट रखडले होते, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. तसेच दिशाने तिच्या वडिलांच्या प्रेमसंबंधाबद्दल आणि व्यवसायासाठी तिने वडिलांना दिलेले पैसे दुसऱ्या महिलेवर कसे खर्च केले याबद्दल रोहन रॉय ला सांगितले होते. असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात सतीश सालियान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मालवणी पोलिसांच्या या क्लोजर रिपोर्टने या प्रकरणाची दिशाच बदलल्याचे बोलले जात आहे.

क्लोजर रिपोर्टनुसार, दिशा सॅलियनने ८ जून २०२० रोजी तिच्या फ्लॅटवर तिचे मित्र इंद्रनील आणि दीप यांच्यासाठी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. संध्याकाळी ७ वाजता संगीत आणि दारूने हि पार्टी सुरू झाली. रात्री ११.४५ च्या सुमारास, दिशा सॅलियनला तिची लंडनमधील मैत्रीण अंकिताचा फोन आला आणि ती बेडरूममध्ये गेली. इंद्रनील, दीप, रोहन, रिशा आणि हिमांशू नंतर तिच्यात सामील झाले. अखेर, हिमांशू हॉलमध्ये परतला, त्यानंतर थोड्याच वेळात, दिशाने स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतले. रोहनच्या मित्रांना तिची अनुपस्थिती लक्षात आल्यावर त्यांनी त्याला कळवले. त्याने दार ठोठावले पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ती बाथरूममध्ये आहे असे गृहीत धरून त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. पुन्हा एकदा कोणतेही उत्तर न आल्याने त्यांनी जबरदस्तीने दार उघडले, तेव्हा रूम मधील उघडी खिडकी पाहून त्यांनी बाहेर पाहिले आणि दिशा सॅलियन पार्क केलेल्या कारजवळ पडलेली आढळली.