5.3 कोटी क्रिकेटप्रेमींनी Live बघितला IND Vs NZ सामना ; Disney Plus Hotstar ने मानले आभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सूरु असलेल्या वर्ल्डकप सामन्यात भारताने बुधवारी न्यूझीलंडवर मात करून सलग नववा सामना जिंकत फायनल मध्ये दिमाखदार प्रवेश केला. त्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटचा किंग कोहलीने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडत आपले एकदिवशीय सामन्यातील 50 वेळ शतक पूर्ण केले आणि त्यामुळे मॅचला चारचांद लागले. एकीकडे हे होत असताना कोहलीने खेळलेली विराट खेळी आणि शमीची गोलंदाजी याने जे लोक क्रिकेट पाहत नाहीत अश्यानाही क्रिकेट पाहण्यास भाग पाडले आणि डिजनी प्लस हॉटस्टारच्या प्रेक्षक संख्येत प्रचंड वाढ झाली.

हॉटस्टारने मानले आभार

क्रिकेट पाहण्यासाठी सर्वात सोयीस्कर प्लॅटफॉर्म म्हणून हॉटस्टारकडे पहिले जाते. सध्याच्या वर्ल्डकपमुळे हॉटस्टारची प्रेक्षकसंख्या ही वाढत आहे. त्यातच भरीस भर म्हणून बुधवारी झालेल्या मॅचमुळे हॉटस्टारची व्हिवरशिप ही तब्ब्ल 5.3 कोटीवर  पोहचली असल्यामुळे त्याचा हॉटस्टारला चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे डिजनी प्लस हॉटस्टारने भारतीय संघांचे ट्विट करत आभार मानले आहे. रेकॉर्ड तोडल्याबद्दल टीम इंडिया आणि डिस्ने प्लस हॉटस्टार यूजर्सच्या चाहत्यांचे आभार… यालाच तर खरा नॉक आऊट सामना म्हणतात असं ट्विट डिजनी प्लस हॉटस्टारने केलं.

सेलिब्रिटिनी लावली हजेरी

दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना हा सर्वांसाठीच खास होता. मागच्या विश्वचषक स्पर्धेतील सेमी फायनल सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडने हरवलं होते. त्यामुळे आता यावेळी नेमके काय घडते हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्यासाठी स्टेडियमवर सिनेतारक देखील अवतरले होते. यामध्ये रणवीर कपूर, कियारा अडवाणी, अनुष्का शर्मा, कुणाल खेमू, शाहिद कपूर, मीरा कपूर, सोहा आली खान, थलैवास रजनीकांत, सिद्धार्थ मल्होत्राचा समावेश होता. अखेर भारताने दणदणीत विजय मिळवत मागील पराभवाचा वचपा काढला.