खा. श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्काराचे वितरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ब्रिगेडीयर जेम्स थॉमस यांच्यावतीने मेजर मिश्रा यांनी तर साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्यावतीने पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, वीर माता श्रीमती यशोदाबाई चव्हाण, तळबीड (ता. कराड), आदर्श माता बाळुताई ढेबे, (कापील), आदर्श विद्यार्थीनी अमृता पाटील (लाहोटी कन्याप्रशाला कराड) तर आदर्श विद्यार्थी सोहेल मुलाणी (वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड) यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात करण्यात आला.

आमदार बाळासाहेब पाटील, विजय दिवस समितीचे प्रमुख कर्नल संभाजीराव पाटील, सचीव अॅड. संभाजीराव मोहिते यांच्यासह समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या सानिध्यात मी वाढलो. पी. डी. पाटील यांनी मला वाढवले, मी त्यांच्यामुळे खासदार झालो. भारतीय सैन्यदलाची शिस्त कराडकरांना लावण्यात कर्नल संभाजीराव पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. मी पुण्याचा कलेक्टर, नागपुरचा आयुक्त म्हणुन काम करुन लोकांची सेवा केली. कर्नल संभाजीराव पाटील यांनी कराडला सैन्यदलाची माहिती व्हावी, यासाठी विजय दिवस समारोह साजरा केला. त्यांचे योगदान मोठे आहे. जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या भुमीत मला विजय दिवस समारोह समितीने यशवंतराव यांच्या नावाने देण्यात आलेला जीवन गौरव पुरस्कार हे मी माझे भाग्य समजतो.

आ. दिलीप वळसे- पाटील म्हणाले, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभलेल्या भुमीत कर्नल संभाजीराव पाटील यांच्या माध्यमातुन खासदार श्रीनिवास पाटील यांनी देण्यात आलेला पुरस्कार हा मोठा आहे. या पुरस्काराला साजेश काम खासदार पाटील यांनी केले आहे. कर्नल पाटील यांनी सामान्य लोकांनी मिल्ट्रीचे वातावरण कसे असते, त्यांचे जीवन कसे असते हे जवळुन दाखवण्याचे काम केले आहे. त्यांचे समाजासाठीचे, तरुण पिढीसाठीचे योगदान मोठे आहे. स्नेहल राजहंस यांनी सुत्रसंचालन केले. रमेश जाधव यांनी आभार मानले.

गौरव ग्रंथाचे प्रकाशन
ज्यांच्यामुळे कराडमध्ये विजय दिवस साजरा होत आहे ते विजय दिवसचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारीत ग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी कर्नल पाटील यांनी विजय दिवस समारोह सुरु करण्यामागची कहानी सांगुन माझा झालेला सन्मान हा भारतीय सीमेवर वजा तपमानाता कार्यरत असलेल्या जवानाचा असल्याचे सांगीतले.