मराठवड्यातील रेल्वे प्रश्नासाठी होणार विभागीय बैठक

bhagwat karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात औरंगाबाद मराठवाडास्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी औरंगाबादच्या शिष्टमंडळाला दिले.

मराठवाडा रेल्वे कृती समितीतर्फे भागवत कराड यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीत मराठवाडयातील शिष्टमंडळाने रेल्वेच्या प्रश्न संदर्भात निवेदन दिले.या सोबतच औरंगाबादतील रेल्वेचे प्रश्न सोडवल्याने कशा प्रकारे या भागाचा विकास होईल हे निदर्शनास आणून दिले.

रेल्वेच्या प्रश्नांना मार्गे लावण्यासाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मराठवाडा स्तरीय बैठक औरंगाबादेत घेण्यात येणार आहे. सर्व प्रश्नावर सकारात्मक दृष्टीने प्रश्न सोडण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन डॉ. भागवत कराड यांनी दिले.