दिवाळीच्या सजावटीसाठी वापरा ‘या’ वनस्पती; घराचे सौंदर्य खुलून येईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठा सण दिवाळी (Diwali 2023) अगदी तोंडावर आली असून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीला सर्वजण घराची झाडलोट करून स्वच्छ करतात आणि सजावट करतात. दिवाळीच्या दिवशी आपलं घर इतरांच्या घरांपेक्षा सुंदर दिसावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण प्रत्येक वेळी आपण त्याच जुन्या पद्धतीने घर सजवतो – जसे फुलांचे हार, झालर इ. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी सजावटी करता खास आयडिया घेऊन आलो आहोत, ज्यामदतीने तुम्ही तुमचे तूमचे घर सजवू शकता.

खरं सांगायचं झालं तर दिवाळीत घर सजवण्यासाठी दिवे, दिवे, मेणबत्त्या आणि फुलांचा वापर केला जातो. पण आणखी एक गोष्ट आहे जी तुमच्या घराच्या सजावटीला मोहिनी घालू शकते आणि ती म्हणजे झाडे. होय, इनडोअर आणि आउटडोअर प्लांट्सच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत तुमच्या घराचा लूक बदलू शकता. यावेळी आम्ही तुमच्यासाठी काही नवीन कल्पना घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे घर अतिशय सुंदरपणे सजवू शकता आणि या सजावटीमध्ये तुमचे पैसेही वाचतील. चला तर मग जाणून घेऊया

१) स्नेक प्लांट

स्नेक प्लांट ही वनस्पती कुठेही आणि कधीही लावता येते. स्नेक प्लांट ही वाढण्यास सोपी असते. महत्वाचे म्हणजे तुम्ही सहजपणे कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता. तसेच जर प्रकाश कमी पडत असेल तरी काही फरक पडत नाही. याच्या वाढीसाठी सुद्धा जास्त पाणी लागत नाही. त्यामुळे अतिशय आकर्षक असलेल्या या वनस्पतीचा वापर तुम्ही घराच्या सजावटीसाठी करू शकता.

२) लकी बांबू –

नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणार्‍या, लकी बांबूला खऱ्या बांबूच्या झाडांसारखे पातळ देठ असतात. ही वनस्पती घरात दीर्घायुष्यासाठी मातीत उगवली जाते, परंतु बरेच गार्डनर्स ते पाणी आणि दगडांनी भरलेल्या काचेच्या फुलदाण्यांमध्ये शोभेच्या वनस्पती म्हणून वाढवतात.भारतातील मुख्य सजावटीच्या वनस्पतींमध्ये लकी बांबूचा समावेश केला जातो.

३) मॉर्निंग हँगिंग प्लांट

मॉर्निंग हँगिंग प्लांट मध्ये निळ्या रंगाची फुले आणि हृदयाच्या आकाराची पाने आहेत. या वनस्पतीमुले तुमच्या घराचे सौंदर्य तर खुलून येतेच परंतु तुमचे घर थंड ठेवण्यासही मदत होते. बाजारात तुम्ही तुमच्या बजेटनुसार हे खरेदी करू शकता. घराच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही हे प्लांट ठेऊ शकता. किंवा खिडक्यांवर याचे वेल लटकवू शकता.