DIY Video : एक नंबर!! टिश्यू पेपरपासून बनवला सुंदर मोगऱ्याचा गजरा; DIY व्हिडिओने वेधलं लक्ष

DIY Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (DIY Video) एखादा समारंभ, पूजा, सोहळा असेल तर महिला साज शृंगार करण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत. मुळात नटणे थटणे महिलांचा अगदी आवडता विषय. त्यात हेअर स्टाईल करायची आणि त्यावर सुंदर असे गजरे माळायचे. आहा क्या बात है!! गजरा म्हटलं की, आपोआपच स्त्रियांना फुलांचा सुगंध येऊ लागतो. पण प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी गजरा मिळेलच असे नाही. त्यामुळे समजा एखाद्या कार्यक्रमाला जाताना तुम्हाला गजरा किंवा फुलं मिळालीच नाहीत तर हिरमोड करून घेऊ नका. कारण, अगदी साध्या टिश्यू पेपरच्या मदतीने तुम्ही सुंदर असा गजरा बनवू शकता आणि केसात माळू शकता.

टिश्यू पेपरपासून असा बनवा मोगऱ्याचा गजरा (DIY Video)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एका तरुणीने फक्त टिश्यूचा वापर करून सुंदर असा मोगऱ्याचा गजरा तयार केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही या गजऱ्याच्या प्रेमात पडाल, इतकं नक्की! हा व्हिडिओ सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डल itistanyasingh नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, या तरुणीने बनवलेला टिश्यू पेपरचा गजरा अगदी मोगऱ्याच्या खऱ्या गजऱ्यासारखा दिसतोय. मुख्य म्हणजे, ती हा गजरा केसात माळूनसुद्धा दाखवतेय.

या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, टिश्यू पेपरचा गजरा बनवण्यासाठी तिने टिश्यू पेपर, दोरा, सुई आणि हिरव्या रंगाचा वापर केला आहे. सुरुवातीला तिने टिश्यू पेपरचे लहान लहान गोळे करून घेतले. (DIY Video) त्यानंतर हे गोळे टिश्यू पेपरच्या लहान चौकोनी तुकड्यावर ठेवले. आता या चौकोनी तुकड्याचे कोपरे एकमेकांना जोडून बोटाने थोडे पिळून घेतल्यानंतर त्यांना मोगऱ्याच्या कळ्यांसारखा आकार प्राप्त झाल्याचे दिसत आहे. तुम्हाला जेवढा मोठा गजरा बनवायचा असेल तेवढ्या कळ्या तुम्ही बनवून घेऊ शकता.

या तयार कळ्यांचा निमुळता भाग देठासारखा दिसतो आहे. ज्याला हिरवा रंग देण्यात आला आहे. आता तयार झालेल्या या कळ्या हुबेहूब मोगऱ्याच्या कळ्यांसारख्या दिसत आहेत. या कळ्यांना सुईच्या मदतीने एका दोऱ्यात ओवून घेतल्यानंतर टिश्यू पेपरपासून बनवलेला सुंदर आणि टिकाऊ असा मोगऱ्याचा गजरा तयार होताना आपण पाहू शकतो.

(DIY Video) हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यावर अनेक नेटकरी सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर ‘वाह!! खूपच सुंदर’ अशा प्रतिक्रिया दिल्याचे दिसत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला असून अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.