Sunday, May 28, 2023

कोकणात महाविकास आघाडीला धक्का!! भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. कोकण विभागात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांना पराभूत केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे आणि बाळाराम पाटील यांच्यात थेट सामना होता. यामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20640 मते पडली तर पराभूत उमेदवार बाळाराम पाटील याना अवघी 9768 मते मिळाले त्यामुळे तब्बल 10 हजार हुन अधिक मतांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय मिळवला आहे. शेकापचे उमेदवार असलेल्या बाळाराम पाटील यांना महाविकास आघाडीने जाहीर पाठिंबा दिला होता तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयांनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केलं आहे. कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भाजपा चे उमेदवार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ५०% हून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा या विजयामध्ये सिंहाचा वाटा आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन असं राणे म्हणाले