हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून साजरी करण्यात येतो. 14 फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) दिवशी अनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तीला मनातील भावना सांगतात. त्यामुळे सर्वत्र प्रेमाचे वातावरण पसरलेले असते. परंतु काही देशांमध्ये “व्हॅलेंटाईन डे”(Valentine’s Day) साजरी करणे हाच मोठा गुन्हा ठरतो. जगात अशी पाच देश आहेत जिथे व्हॅलेंटाईन डे साजरी करणे महागात पडू शकते. ही पाच देश नेमकी कोणती आहेत आणि तेथे व्हॅलेंटाईन डे का साजरी केला जात नाही आपण जाणून घेऊया.
सौदी अरेबिया – सौदी अरेबियामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरी करण्यावर मनाई आहे. हा देश व्हॅलेंटाईन डे साजरी करणाऱ्या विचारधारेच्या विरोधात आहे. या देशांमध्ये तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरी करायला गेला तर तुम्हाला अटक देखील होऊ शकते. तसेच, तुमच्या जवळ असलेले सामान सर्व काही जप्त केले जाऊ शकतो.
पाकिस्तान – पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरी करणे इस्लामी शिक्षणाच्या विरोधात आहे. पाकिस्तानमध्ये पब्लिक प्लेसमध्ये वॅलेंटाईन डे साजरी करण्यावर बंधन घालण्यात आली आहेत. त्यामुळे जो कोणी पाकिस्तानमध्ये खुलेआम प्रेम व्यक्त करेल त्याला पोलीस ताब्यात घेऊ शकतात.
मलेशिया – मलेशियामध्ये 2005 पासून मुस्लिमांसाठी व्हॅलेंटाईन डे साजरी करण्यावर बंदी आहे. येथील मुस्लिम हा दिवस साजरा करण्यासाठी कुठेही बाहेर जाऊ शकत नाहीत. 2012 मध्ये काही जोडप्यांनी व्हॅलेंटाईन डे साजरी केल्यामुळे पोलिसांनी हॉटेल्सची तोडफोड केली होती आणि 200 हून अधिक मुसलमान जोडप्यांना अटक केली.
इराण – इस्लामिक देश इराणमध्ये धार्मिक मौलवी राज्य करतात येथील सरकारने व्हॅलेंटाईन डेच्या सर्व भेटवस्तू आणि वस्तूंच्या निर्मितीवर बंदी घातली आहे. या दिवशी कोणीही दुसऱ्या व्यक्तीला प्रपोज केले तर तो गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे चुकूनही इराणमध्ये व्हॅलेंटाईन डेसाठी जाऊ नका.
इंडोनेशिया – इंडोनेशियामध्ये व्हॅलेंटाईन डेवर (Valentine’s Day) बंदी घालणारा कोणताही कायदा बनवण्यात आलेला नाही. परंतु छोट्या छोट्या गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. जसे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला पब्लिक प्लेसमध्ये प्रपोज करू शकत नाही. तसेच एखाद्या व्यक्तीचे चुंबन घेऊ शकत नाही. त्याला गुलाब देऊ शकत नाही. तसेच मिठी देखील मारू शकत नाही.