सर्दी- खोकला झाल्यास दुर्लक्ष करू नका; ICMR चा गंभीर इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना नंतर गेल्या 2 महिन्यापासून देशात सर्दी, खोकला आणि काही प्रमाणात ताप असलेल्या रुग्णाची संख्या वाढत आहे. परंतु याकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष्य करू नका. याचे कारण म्हणजे इन्फ्लुएंझा A चा उपप्रकार ‘H3N2’ आहे. याबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने इशारा दिला आहे.

ICMR शास्त्रज्ञांनी सांगितले की, H3N2 गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. सर्दी, खोकला, ताप, घसादुखी, अंगदुखी, मळमळ ही या आजाराची मुख्य लक्षणे आहे. या विषाणूबाबत काळीज घेण्याची गरज आहे. कारण फ्लूच्या इतर उपप्रकारांपेक्षा H3N2 मुळे रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यत: हवेतून होत आहे. या विषाणू नंतर ताप 2-3 दिवसात निघून जातो परंतु खोकला मात्र 3 आठवडे टिकू शकतो.

या विषाणूपासून दूर राहण्यासाठी ICMR ने काही मार्गदर्शक तत्त्वेही दिली आहेत. त्यानुसार, नियमितपणे हात धुवावे, गर्दीच्या ठिकाणी जाण टाळावे, गरज भासल्यास मास्क वापरावे, खोकताना काळजी घ्यावी. तसेच कोणतेही लक्षणे दिसली तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स किंवा इतर औषधे घेणे टाळण्याचा सल्लाही ICMR ने दिला आहे