पाकिटात चुकूनही ठेऊ नका ‘या’ वस्तू; अन्यथा लक्ष्मी माता प्रसन्न होणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण आपल्या आयुष्यात किती यशस्वी होतो किंवा यशाच्या शिखरावर पोचतो हे आपल्या मेहनतीवर आणि नशिबावर अवलंबून असत. जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट तर खूप महत्त्वाचे आहेतच परंतु नशिबाची सुद्धा साथ मिळणे आवश्यक आहे. काही लोक भरपूर पैसे कमवतात परंतु त्यांच्या हातात पैसे राहत नाही आणि काही जणांनी कितीही मेहनत केली तरी त्यांना पैसे मिळत नाही. वास्तुशास्त्रात यावर उपाय म्हणून अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार, निगेटिव्ह गोष्टी निर्माण करणाऱ्या वस्तू शक्यतो आपण आपल्या पर्स किंवा पाकिटात ठेऊ नये नाहीतर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही. चला जाणून घेऊया याबाबत सविस्तरपणे…

या गोष्टी करू नये –

कोणत्याही व्यक्तीने आपले पाकीट स्वच्छ ठेवावे. पाकिटातील अनावश्यक कागदपत्रे आणि इतर गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत.

फाटलेल्या नोटा चुकूनही आपल्या पाकिटात ठेऊ नयेत. असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

जर तुम्ही कधी कोणाकडून कर्ज घेतले असेल आणि तुम्ही ती रक्कम त्याला परत करणार असाल तर ती रक्कम तुमच्या पर्समध्ये ठेवू नये किंवा एखाद्याला उधार घेतलेल्या रकमेवर व्याजाचे पैसे द्यावे लागत असतील तर तेही पर्समध्ये ठेवू नका. असे पैसे पर्समध्ये ठेवल्याने कर्ज वाढते आणि आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता असते.

वास्तुशास्त्रानुसार, पाकिटात कधीही न लागणारी आणि जुनी काही कागदपत्रे तसेच खोटी नाणी ठेऊ नये. असं केल्याचं व्यक्तीच्या इनकम वर परिणाम होण्याची शक्यता असते.

आर्थिक संकट टाळण्यासाठी पर्समध्ये कधीही चावी ठेवू नये. कारण जेव्हा केव्हा पर्समध्ये चावी ठेवली जाते. यामुळे व्यक्तीला कायम आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. Hello Maharashtra याची पुष्टी करत नाही.