हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 14 फेब्रुवारी रोजी कपल्स व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) सेलिब्रेट करतील. अनेकजण आपल्याला आवडत असलेल्या व्यक्तींना मनातील भावना सांगतील. परंतु यादिवशी सिंगल असलेल्या लोकांना हमखास हा प्रश्न पडेल की आपण काय करावे? अशा लोकांसाठीच ही बातमी आहे. Valentine’s Day दिवशी तुम्हाला तुमचा दिवस कसा घालवावा हा प्रश्न पडत असेल तर पुढील गोष्टी नक्की करा.
सोलो ऍक्टिव्हिटी करा – व्हॅलेंटाईन डे दिवशी तुम्ही बोर होत असाल तर सोलो ऍक्टिव्हिटी करण्यावर भर द्या. कुंड्यांमध्ये नवी रोपे लावा, सायकल चालवण्यासाठी जावा, एक दिवस स्वतःसाठी वेळ काढून कुठेतरी अनोळख्या ठिकाणी फिरायला जावा. अशा सोप्या गोष्टी तुम्ही यादिवशी नक्कीच करू शकता.
फूड टेस्टिंग करा- तुम्हाला जर वेगवेगळे पदार्थ चाखायला आवडत असतील आणि त्याचा स्वाद घ्यायला आवडत असेल तर या दिवशी तुम्ही वेगवेगळ्या खाद्य ठिकाणांना भेट द्या. समोर तुम्हाला तुमच्या आवडीचा पदार्थ आला की चेहऱ्यावर लगेच होईल. तसेच या दिवशी तुम्ही एकट्या आहात याची देखील तुम्हाला जाणीव होणार नाही.
पेंडिंग कामे करा – व्हॅलेंटाईन डे दिवशी तुम्ही घरी असाल तर तुमची पेंडिंग राहिलेली कामे उरका. अनेकवेळा कामाच्या गडबडीमध्ये आपल्याकडून बारीक-सारीक कामे तशीच राहून जातात. यादिवशी तुम्हीही कामे पूर्ण करू शकता.
नविन गोष्टी शिका – व्हॅलेंटाईन डे दिवशी तुम्ही स्वतःला सर्वात जास्त वेळ द्या. स्वतःविषयी प्रेम व्यक्त केले तरी हरकत नाही. कारण हा दिवस प्रेमाचाच दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी तुम्ही अनेक नवीन गोष्टी शिकू शकता. जे छंद तुमचे तुटलेले आहेत, त्यांना पुन्हा नव्याने सुरू करू शकता.