Heart Attack चा धोका टाळण्यासाठी रोजच्या जीवनात ‘या’ 5 गोष्टी करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हृदय हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. हृदय बंद पडलं तर माणसाचा जीव जातो. हृदय हे पंपिंग मशीन आहे जे न थांबता रक्त पंप करत राहते. हृदयात रक्त शुद्ध होते आणि शरीराच्या प्रत्येक भागात पाठवले जाते. यामुळेच हृदय निरोगी असणे खूप गरजेचे आहे. परंतु आजकालच्या या धावपळीच्या जगात हृदयविकाराचे (Heart Attack) प्रमाण वाढलं आहे. अगदी तरुण मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत कोणाला कधी हृदयविकाराचा झटका येईल हे सांगता येत नाही.

हृदयविकाराला जास्त कारणीभूत गोष्ट म्हणजे आपली चुकीची जीवनशैली हेच आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी आपल्याला काही सवई बदलाव्या लागतील तसेच काही सवई अमलात सुद्धा आणाव्या लागतील. आज आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहोत ज्या हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात.

1) धूम्रपान करू नका-

धूम्रपान करणे ही सर्वात वाईट सवय आहे. धुम्रपान केल्याने फुफ्फुसे तर जळतातच पण हृदयाचे आरोग्यही बिघडते. धूम्रपानामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे धूम्रपान करू नका.

2) वजन कमी करा-

निरोगी हृदयासाठी तुम्हाला तुमचं वजन नियंत्रणात ठेवावा लागेल. त्यासाठी तुम्हाला योग्य प्रमाणात आहार घ्यावा लागेल आणि नियमित व्यायामावर जोर द्यावा लागेल. कारण लठ्ठपणामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो.

3) हेल्दी फूड खा –

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी निरोगी आहारावर जोर द्या. विशेषतः जास्त तेलकट पदार्थ, जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न, किंवा जास्त मीठ खाऊ नका. त्याऐवजी बदाम, काजू, फळे खा… हिरव्या पालेभाज्या, धान्य खा.

4) तणाव घेऊ नका-

आजकाल हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे ताणतणाव हेच समोर येत आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात ताणतणाव आणि स्ट्रेस वाढला आहे. परंतु जास्त तणावामुळे बीपी वाढण्याची शक्यता असते आणि त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. त्यामुळे कधीही टेन्शन मध्ये राहू नका. तसेच जर तुम्ही तणावात असला तर ध्यान आणि योग्य हा त्यावर रामबाण उपाय ठरू शकेल.

5) नियमित व्यायाम करा –

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे. हृदय हे स्नायूंनी बनलेले असते आणि स्नायू व्यायामामुळे मजबूत होतात. त्यामुळे दररोज शारीरिक हालचाल वाढवा आणि नियमित व्यायामाला प्राधान्य द्या.