New Year : 1 जानेवारीआधी करून घ्या ही 4 कामं, नाहीतर नंतर करताल पश्चाताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – 2022 हे वर्ष संपायला काही तास शिल्लक आहेत. याअगोदर तुम्हाला 4 कामे करावी लागणार आहेत. नाही तर नव्या वर्षाच्या (New Year) सुरुवातीलाच तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 1 जानेवारीपासून (New Year) अनेक बदल होणार आहेत. त्याआधी जर तुम्ही ही कामं केलं नाहीत तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया हि ४ कामे कोणती आहेत ती.

1) जर तुम्ही 2022-23 साठी आयटीआर भरला नसेल, तर तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे. जर तुम्ही आयटीआर फाईल करत असाल आणि अजून गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 म्हणजेच अ‍ॅसेसमेंट इयर 2022-23 साठी आयटीआर फाईल केले नसेल तर 31 डिसेंबरपूर्वी ते सेटल करा. ज्या व्यक्तींना 31 जुलै 2022 च्या अंतिम मुदतीपर्यंत आयटीआर दाखल करता आलेला नाही, त्यांना आता केवळ बिल्ड आयटीआरच भरता येणार आहे. हे चुकलं तर तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

2) जर तुम्ही नवीन वर्षात (New Year) गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ती आताच घ्या. याचं कारण म्हणजे अनेक कंपन्यां आपल्या कारच्या किमती 1 जानेवारीपासून वाढवणार आहेत. यामध्ये मारुती सुझुकी, हुंडाई मोटर, टाटा मोटर्स, मर्सिडीज बेंझ, ऑडी, रेनॉल्ट, केआयए इंडिया आणि एमजी या गाड्यांचा समावेश आहे.

3) 1 जानेवारीपासून (New Year) बँक लॉकरशी संबंधित नियमांत बदल होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व प्रमुख बँकांना १ जानेवारी 2023 पूर्वी त्यांच्या धारकांना लॉकर करार करण्यास सांगितले आहे. जर तुम्ही बँकेचं लॉकर घेतले असेल तर नक्की शाखेत जाऊन तुम्ही लॉकरचे नियम बदलले आहेत का, याची खात्री करून घ्या.

4) बँक ऑफ बडोदाने यावर्षी विशेष एफडी सुरू केली होती. याअंतर्गत बँक ऑफ बडोदाने 444 दिवस आणि 555 दिवसांच्या 2 एफडी काढल्या असून यामध्ये ग्राहकांना अनुक्रमे 5.75 टक्के आणि 6 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात होते. त्यामुळे ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत या योजनांचा लाभ घेता येणार आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!