हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या दिवसेंदिवस आधार कार्डचा नंबर वापरून फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर, आता आधार पे द्वारे OTP शिवाय खात्यातून पैसे काढणे देखील सहज सोपे झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होत आहे. ही फसवणूक आपल्यासोबत होऊ नये, यासाठी बायोमेट्रिक्स लॉक करणे अत्यंत गरजेचे आहे. या फिचरचा वापर करून तुम्ही होणाऱ्या फसवणुकीपासून वाचू शकता. चला तर मग जाणून घेऊयात बायोमेट्रिक्स लॉक करण्याची प्रोसेस.
बायोमेट्रिक कसे लॉक करावे
1) सर्वात प्रथम तुम्ही आधार वेबसाईटवर म्हणजेच
https://resident.uidai.gov.in/bio-lock वर जावा.
2) यानंतर ‘My Aadhaar’ टॅबवर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार सेवा अशी लिंक दिसेल.
3) आधार सेवा वरली केल्यानंतर तुम्हाला आधार लॉक किंवा अनलॉक करण्याची सुविधा उपलब्ध होईल
4) यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा व्हीआयडी टाकावा लागेल.
5) यानंतर तुम्हाला सेंड ओटीपीवर क्लिक करावे लागेल.
6) त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक ओटीपी येईल तो भरल्यानंतर तुम्हाला Enable वर क्लिक करावे लागेल.
7) यामार्फत तुम्हाला बायोमेट्रिक्स लॉक करता येईल.
mAadhaar App वरून बायोमेट्रिक लॉक करा.
1) सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअर वरून mAadhaar अॅप डाउनलोड करा.
2) या ॲपवर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून ॲप ऍक्टिव्हेट करावे लागेल.
3) त्यानंतरच तुम्हाला तुमचे आधार प्रोफाइल दिसेल.
4) या प्रोफाइल वर तुम्हाला कोपऱ्यात तीन ठिपके दिसतील, त्यावर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा.
5) खाली आल्यानंतर तुम्हाला लॉक बायोमेट्रिकचा पर्याय दिसेल.
6) यावर क्लिक केल्यानंतर फक्त डिजिटल पिन टाकून लॉक active करा.
बायोमेट्रिक लॉक करण्याचे अनेक फायदे आहेत. आधार कार्ड लॉक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डचा वापर इतर गैर व्यक्तीला करता येणार नाही. तसेच आधार कार्डच्या नंबरवरून बँकेशी संबंधित कोणतीही प्रक्रिया तिसऱ्या व्यक्तीला करता येणार नाही. यामुळे तुम्ही कोणत्याही फसवणुकीला बळी पडणार नाही. तसेच आधार कार्डमुळे तुमच्या खात्यातील पैसे देखील कोण उडवू शकणार नाही.