तुम्हीही ब्लॅक टी लिंबू टाकून पीता का? उद्भवू शकतो हा मोठा आजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दुधाचा चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असते असे आपण अनेकवेळा ऐकतो. त्यामुळेच आपण दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टीचा पर्याय निवडतो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का ब्लॅक टी पिल्याने ही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच याच ब्लॅक टीमध्ये लिंबू टाकून पिल्याने कॅन्सरचा आजार उद्भवू शकतो. होय, तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही परंतु ब्लॅक टीमध्ये लिंबू टाकून पिल्यास आरोग्याच्या समस्या नव्हे तर कॅन्सर सारखा मोठा आजार होऊ शकतो.

एका रिसर्च नुसार असे समोर आले आहे की ब्लॅक टी मध्ये लिंबू टाकून पिल्यास मुतखड्यासारखा आजार उद्भवू शकतो. इतकेच नव्हे तर यामुळे कॅन्सरचा आजार देखील होऊ शकतो. ब्लॅक टी मधील असणारे गुणधर्म थेट तुमच्या किडनीवर परिणाम करतात त्यामुळे किडनी संदर्भात देखील आजार निर्माण होऊ शकतात. ब्लॅक टीमधून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतो. परंतु व्हिटॅमिन सीमुळे ऑक्सिलेटचं प्रमाण वाढू शकते.

डॉक्टर देखील आपल्याला असा सल्ला देतात की कोणत्याही गोष्टी सेवन करण्यापूर्वी त्याचे प्रमाण आपल्याला माहीत असावे. अनेक वेळा आपण पित्ताचा त्रास टाळण्यासाठी दोन थेंब ऐवजी चार ते पाच थेंब ब्लॅक टीमध्ये टाकतो. परंतु असे केल्यामुळेच आरोग्य संदर्भात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे कधीही ब्लॅक टी मध्ये लिंबू टाकून पिताना त्याचे प्रमाण तपासावे. त्याचबरोबर जास्त त्रास होत असला तरच ब्लॅक टी आणि लिंबूचे सेवन करावे.