सध्याच्या काळात इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २०१४ साली मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारने महिलांची धुरापासून मुक्तता करण्यासाठी उज्वला योजना आणली. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर देण्यात आले. एवढेच नाही तर हे सिलेंडर रिफील केल्यावर सुद्धा देखील अनुदान देण्यात येते. मात्र काही ठिकाणी सिलेंडर महाग मिळते. मग अशावेळी काय करायचे ? याचीच माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
जरा तुम्ही उज्वला योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला अधिक किंमतीने सिलेंडर मिळत असेल तर तुम्ही याबाबतची तक्रार नोंदवू शकता. उजवला योजनेच्या लाभार्थ्यांना १४. २ किलो सिलेंडर करिता ८०३ रुपये अनुदान मिळते. एवढेच नाही तर सिलेंडर रिफील केल्यानंतर देखील अनुदान मिळते. हे अनुदान ग्राहकांच्या खात्यात जमा होते. तुम्हाला देखील महागड्या किमतीने सिलेंडर मिळत असेल तर उज्वला योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करू शकता.
कुठे कराल तक्रार ?
हेल्पलाइन नंबर 1800-266-6696 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता. येथे तुम्ही त्या एजन्सी आणि डीलरबद्दल तक्रार करू शकता. यासोबतच तुम्ही एलपीजी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 1906 वर सुद्धा तक्रार करू शकता. जर तुम्ही इंडेनचा सिलिंडर वापरत असाल, तर तुम्ही इंडेन गॅस एजन्सीच्या १८००-२३३-३५५५ या हेल्पलाइन क्रमांकावरही तुमची तक्रार नोंदवू शकता.
यासोबतच तुम्ही भारत सरकारच्या https://www.mopnge-seva.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊनही तुमची तक्रार करू शकणार आहात. तक्रार दाखल केल्यानंतर तुमच्या तक्रारीची पडताळणी केली जाईल, पडताळणी नंतर मग तुमच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई होईल. जर यामध्ये कोणी दोषी आढळल तर त्यावर कारवाई होईल.