Loan साठी वारंवार अर्ज करताय? तर जाणून घ्या ‘या’ गोष्टी

loan (2)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकालच्या डिजिटल युगात बँक अन फायनान्स कंपनीकडून लोन किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना क्रेडिट स्कोरकडे सर्वात आधी पाहिले जाते. तुमचा क्रेडिट स्कोर जितका चांगला, तितकी चांगल्या अटींवर कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. मात्र, अनेकदा लोन इन्क्वायरीमुळे स्कोरवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे हार्ड आणि सॉफ्ट इन्क्वायरी काय असते अन त्याचा काय परिणाम होतो, हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

हार्ड इन्क्वायरी म्हणजे –

जेव्हा तुम्ही लोन किंवा क्रेडिट कार्डसाठी प्रत्यक्ष अर्ज करता, तेव्हा बँक किंवा फाइनान्स संस्था तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासते. ही तपासणी ‘हार्ड इन्क्वायरी’ म्हणून ओळखली जाते. जर यामध्ये एखादी चूक जसे की वेळेवर EMI न भरणे आढळले , तर तुमचा स्कोर थोडासा खाली जाऊ शकतो. ही नोंद तब्बल दोन वर्षांपर्यंत तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये राहू शकते.

सॉफ्ट इन्क्वायरी म्हणजे –

तुम्ही स्वतः तुमचा क्रेडिट स्कोर तपासता किंवा एखाद्या बँकेने तुम्हाला प्री-अप्रुव्ह्ड ऑफर दिला, तर त्यासाठी सॉफ्ट इन्क्वायरी केली जाते. सॉफ्ट इन्क्वायरीमुळे तुमच्या क्रेडिट स्कोरवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.

तुमचा क्रेडिट स्कोर कमी –

एकाच वेळेस अनेक लोन किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास, प्रत्येक वेळी हार्ड इन्क्वायरी होते. यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहात, असा समज बँकांना होतो अन त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर कमी होतो. याचा थेट परिणाम म्हणजे भविष्यात कमी व्याजदरावर कर्ज मिळणे कठीण होते. तसेच खूप कमी कालावधीत अनेक इन्क्वायरी झाल्यास त्या दीर्घकाळासाठी क्रेडिट रिपोर्टमध्ये राहतात. त्यामुळे अर्ज करताना योग्य कालावधी ठेवा अन गरज पडल्याशिवाय अर्ज करू नका.

लोन किंवा क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी थोडा विचार –

हार्ड इन्क्वायरीमुळे स्कोर खाली गेला तरी काळजी करू नका. वेळेवर EMI आणि बिल भरल्यास, अन क्रेडिट युटिलायझेशन कमी ठेवले, तर काही महिन्यांत स्कोर पुन्हा सुधारू शकतो. त्यामुळे लोन किंवा क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी थोडा विचार करा.