भारतीय आहार पद्धतीमध्ये डाळ भात हा पदार्थ आवर्जून केला जातो. अधिक डाळ भांड्यात शिजवली जायची मात्र सध्या प्रत्येक घरात डाळ शिजवण्यासाठी कुकरचा वापर होतोच. मात्र बऱ्याचवेळा कुकरमध्ये डाळ शिजवताना ती फसफसते. म्हणूनच आजच्या लेखात आपण यासंदर्भातले काही महत्वाचे टिप्स जाणून घेणार आहोत…
कुकर मध्ये बऱ्याच डाळ शिजवत असताना त्याचे प्रमाण व्यवस्थित घेणे गरजेचे असते. कुकरमध्ये डाळ शिजत असताना आपण जास्त प्रमाणात डाळ शिजवायला टाकल्याने असे होऊ शकते. शिवाय कुकरमध्ये प्रमाणाच्या बाहेर जर जास्त पाणी भरलं असेल तरीसुद्धा डाळ पाण्यात मिसळून शिट्टीद्वारे बाहेर पडू शकते. याबरोबरच आणखी एक महत्त्वाची चूक म्हणजे बरेच जण पटकन कुकरची शिट्टी वाजवी यासाठी मोठ्या आचेवर डाळ शिजवायला घालतात त्यामुळे देखील डाळ बाहेर पडू शकते.
कुकर मधून पाणी बाहेर येत असेल तर काय करावे?
कुकरमधून पाणी बाहेर येऊ नये यासाठी तुम्ही जेव्हा डाळ शिजवायला घालता तेव्हा त्यामध्ये एक चमचा किंवा छोटी वाटी टाका. जेणेकरून कुकरचे पाणी शिटी द्वारे बाहेर येणार नाही तसंच पदार्थ शिजण्यासाठी लागणारी योग्य वाफ त्यामध्ये निर्माण होण्यास मदत मिळेल.
म्हणून कुकर मधून पाणी गळते
- कुकरचे रबर सैल असल्यामुळे
- कुकरची शिट्टी व्यवस्थित नसेल
- कुकरच्या आत मध्ये दाब निर्माण होत नसेल तर
कुकर मध्ये डाळ शिजवत असताना आणखी एक महत्त्वाची टीप तुम्ही जाणून घ्या त्यासाठी जेव्हा तुम्ही डाळ शिजवायला घालतात त्याआधी गरम पाण्यात 15 मिनिटे डाळ भिजत ठेवा त्यानंतर कुकरमध्ये जेव्हा तुम्ही डाळ टाकता तेव्हा गरजेनुसार पाणी घालून ते चमच्याने हलवून घ्या मसूर डाळ बनवताना अनेकदा कुकरच्या तळाला डाळ चिकटते तसंच कच्ची राहते पण ही काळजी घेतली तर चांगली शिजेल.