हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| परदेशातच नव्हे तर भारतामध्ये देखील बियर आणि वाईन पिणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. अनेकनंतर दररोज ही बिअरचे सेवन करत असतात. परंतु दररोज बियरचे सेवन करणे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. बियरचे सेवन केल्यामुळे कमी वयामध्ये विविध आजार होतात. या आजारांमुळे काहींचा मृत्यूही होतो. हे आजार नेमके कोणते असतात?? बियर पिल्यमुळे शरीरावर त्याचा काय परिणाम होतो?? याविषयी जाणून घ्या.
वजनात वेगाने वाढ होते – बियरमध्ये मोठया प्रमाणात कॅलरीचे प्रमाण असते. बियरचे सेवन केल्यामुळे याच कॅलरीज शरीरामध्ये जातात. त्यामुळे शरीरात कार्बोहायड्रेट वाढते. तसेच, बियर केल्यामुळे भूकही जास्त लागते. ही भूक शरीराचे वजन वाढवण्याचे काम करतात. बियर पिल्यामुळे पचनक्रियेमध्येही अडचणी निर्माण होतात.
मॅग्नेशियम, विटामिन B ची कमतरता – बियर पिल्यामुळे शरीरातील पोषक तत्वे नष्ट होण्यास सुरुवात होते. याच बियरमुळे शरीरातील फॉलिक ऍसिड आणि झिंक नष्ट होते. ही तत्वे नष्ट होणे शरीरासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे बियर पिताना या सर्व बाबी लक्षात ठेवाव्यात.
हृदयाचे आजार- हृदय हे अत्यंत नाजूक असते. अशा स्थितीत बिअर पिल्याने हृदयाच्या निर्माण होऊ शकतात तसेच रक्तदाब वाढू शकतो. यासह ट्रायग्लिसराईड वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. दररोज बिअर पिल्यामुळे इतरही अनेक आजार उद्भवतात. परिणामी शरीराचे आरोग्य चांगले राहत नाही.
लिव्हरचे नुकसान – बियर सर्वात जास्त लिव्हरचे नुकसान करत असते. बियर पिल्याने लिव्हरवर सूज ही येते. यामुळे गंभीर आजार निर्माण होतात. फॅटी लीवर, लिव्हर सोरायसिस असे आजार हे बियर पिल्यामुळे उद्भवतात. पुढे या आजारांवर निदान करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे दररोज बियर पिऊ नये.
कॅन्सरची होतो – अल्कोहोल आणि बियरमुळे कॅन्सरचाही धोका उद्भवतो. दररोज बियर पिल्यमुळे कोलोरेक्टल कॅन्सर होऊ शकतो. शरीराला झालेला कोणताही कॅन्सर हा घातक असतो. या कॅन्सरमुळे अनेकांचा जीव ही जातो. त्यामुळे बियरचे सेवन करताना ते जपून करावे.