Navratri 2023: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवरात्र उत्सव म्हणजे दुर्गा देवीच्या 9 अवतारांचा जागर होय. या 9 दिवसांच्या काळात दुर्गा देवी ची पुजा केली जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांमध्ये तर नवरात्र उत्सव मोठया धुमधडाकात साजरी केला जातो. त्यामुळे नवरात्र उत्सवात साडेतीन शक्तीपिठांवर प्रचंड गर्दी असते. महाराष्ट्रात महालक्ष्मी मंदिर, रेणुकादेवी मंदिर, तुळजाभवानी मंदिर आणि सप्तशृंगीदेवी मंदिर म्हणजेच ही साडेतीन शक्तिपीठे  खूप प्रसिद्ध आहेत. या शक्तिपीठांमागे मोठा इतिहास आहे. तसेच त्यांना धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व आहे. आज आपण याचं शक्तीपिठांविषयी जाणून घेणार आहोत.

महालक्ष्मी मंदिर

कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर हे पुराणातील 108 आणि महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक आहे. या मंदिराला कर्‍हाड येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे अशी मान्यता आहे. मात्र याबाबत कोणतेही ठोस पुरावे आजवर सापडलेले नाहीत. मात्र असेही म्हणतात की, कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते. त्यांना देवीचा वरप्रसाद देखील मिळाला होता. सातव्या शतकात चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून आजवर हे मंदिर त्याच ठिकाणी स्थित आहे. या मंदिरात देवीचे दर्शन हजारो भाविक येत असतात.

रेणुकादेवी मंदिर

साडेतीन पीठांपैकी एक देवता रेणुकादेवी मंदिर आहे. खरे तर, साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक मूळ जागृत पीठ आहे. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची रेणुकादेवी कुलदेवता आहे. रेणुका देवीचे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर नांदेड जिल्ह्यात, माहूर तालुक्यात आहे. एकेकाळी परशुरामाला डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून माहूरला मातापूर म्हणले जात होते. असे म्हणतात कि, रेणुकादेवीसमोर मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. त्यामुळे भाविक खूप लांबून दर्शन घेण्यासाठी येत असतात.

तुळजाभवानी मंदिर

तुळजाभवानी मंदिर देखील साडेतीन शक्तीपीठांमधील एक आहे. तुळजाभवानी देवीला महाराष्ट्राची कुलस्वामीनी म्हणले जाते. तुळजाभवानी ही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्यदेवता होती. या मंदिराची स्थापना सतराव्या किंवा अठराव्या शतकात केली असावी अशी मान्यता आहे. मात्र याबाबत देखील कोणताही ठोस पुरावा नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुलदेवता म्हणून तुळजाभवानी देवीला मान दिला जातो. नवरात्र उत्सवाच्या मंदिरात मोठया उत्साहात आणि भक्ती भावाने देवीची आराधना केली जाते.

सप्तशृंगीदेवी मंदिर

सप्तशृंगीदेवीला साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे स्थान आहे. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप मानले जाते. पौराणिक कथेनुसार, शुंभनिशुंभ व महिषासुराचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले होते. तसेच , सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे देखील आहेत, ज्यामुळे गडाचे नाव सप्तशृंगगड असे पडले. या गडावर दरवर्षी चैत्र महिन्यात यात्रा भरते. भाविक मोठया श्रद्धेने गडावर सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.