व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

काजू खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुक्या मेव्यामधील राजा अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे ‘काजूगर’.. काजू एक हेल्दी आणि स्वादिष्ट ड्रायफ्रुट आहे. काजूमध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे, पोटॅशिअम, झिंक (जस्त), फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॉपर अशी पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

काजू खाण्याचे फायदे-

काजूमध्ये ह्रदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठीचे फॅट असतात. त्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत मिळते. काजमूध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅट असते. हे बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. हृदय स्वस्थ राखण्यास काजूच्या सेवनामुळे मदत मिळते. त्यामुळे ह्रदयविकाराच्या आजारापासून तुम्ही दूर राहता. पण यासाठी काजूचे सेवनही योग्य प्रमाणात होणे गरजेचे असते.

नियमिपणे काजूचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. काजूमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मेटाबॉलिज्म जलद होण्यास मदत होते. काजूच्या खाल्ल्याने पोट भरते आणि दुसरं काहीही खाण्याची इच्छा होत नाही. याशिवाय काजूमध्ये असलेले मॅग्नेशीअम पचनशक्ती वाढवते. यामध्ये असलेली कार्बोदके वजन कमी करण्यास मदत करतात.

काजूमध्ये असलेले व्हिटॅमिन E हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. डोळ्यांना इतर त्रासापासून दूर ठेवण्याचे कामही काजूगर करतात. काजूतील पोषक गुणधर्मांमुळे, सूर्यकिरणांमुळे डोळ्यांची हानीला संरक्षण मिळते त्यामुळे चांगल्या डोळ्यांसाठी काजू गराचे सेवन करावे.

भिजवलेले काजू मेंदूच्या आरोग्यासाठीही खूप उपयुक्त असतात. काजूमध्ये ब्रेन बूस्टर पोषक घटक असतात, जे मेंदूचे कार्य वाढवण्यास आणि तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतात. काजूच्या सेवनामुळे बुद्धी तल्लख होते. काजूमुळे प्रतिकारशक्ती वाढते.