बापरे ! सर्जरी करताना महिलेच्या पोटात राहिला टॉवेल; समजताच महिलेने घेतली कोर्टात धाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राजस्थान मधील जोधपुरमधून एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आलेला आहे. काही दिवसापूर्वी डॉक्टरांनी जिवंत असणाऱ्या तरुणाला मृत घोषित केले होते. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ही घटना राजस्थान मधील आहे. गर्भवती महिलेचे सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी झाली. त्यावेळी तिची शस्त्रक्रिया केली. परंतु डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एक मोठी घटना घडलेली आहे. सर्जरी केल्यानंतर डॉक्टरांनी टाके देखील घातले. परंतु शस्त्रक्रिया दरम्यान वापरण्यात आलेला टॉवेल महिलेच्या पोटात राहिला. हे डॉक्टरांच्या संपूर्ण टीमला समजले नाही.

त्या महिलेची डिलिव्हरी झाल्यानंतर सतत महिलेच्या पोटात दुखत होते. तिने अनेक वैद्यकीय उपचार घेतले. परंतु तिच्या पोटात गाठ आली आहे. असे तिला सांगण्यात आले. शेवटी तिने जोधपूर येथील डॉक्टरांनी तपासणी केली. त्यावेळी त्या महिलेच्या पोटात टॉवेल दिसत होता. परंतु हे समजल्यानंतर त्या महिलेने कोर्टात धाव घेतलेली आहे.

या घटनेची सुरुवात एक जुलैपासून झाली होती. ती महिला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात गेली होती. डिलिव्हरी झाल्यानंतर सतत तिच्या पोटात वेदना होत होत्या. त्यानंतर तिने खाजगी रुग्णालयात देखील उपचार घेतले. परंतु प्रत्येक वेळीला पोटात गाठ असल्याची समस्या सांगून घरी पाठवण्यात आले होते. सर्जरी करताना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्या तरुणीच्या जीवावर बेतेल असा प्रसंग घडलेला आहे. जोधपूर येथील एम्स रुग्णालयात सिटीस्कॅन आणि अल्ट्रासाउंडमध्ये त्या महिलेच्या पोटात टॉवेल असल्याचे स्पष्ट दिसलेले आहे. महिलेच्या पोटात बरेच दिवस टॉवेल असल्याने नुकसान झालेले आहे. त्यामुळे त्या महिलेला पुढील काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे.