हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. सर्वच स्तरातून या घटनेविरुद्ध आवाज उठवला जात असून सदर गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा देण्याचे आवाहन समाजातून केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज देशभरातील डॉक्टरांनी 24 तासांच्या बंदची (Doctors Strike) हाक दिली आहे. आज सकाळी ६ वाजल्यापासून हा संप सुरु झाला असून उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत तो सुरु राहणार आहे. डॉक्टरांची संघटना असलेल्या IMA ने या संपात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत सर्वच आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आज कोणकोणत्या सेवा बंद राहतील आणि कोणत्या सेवा सुरु राहतील हे आपण जाणून घेऊयात….
कोणत्या सेवा बंद राहणार? Doctors Strike
या संपाचा परिणाम खासगी आणि सरकारी हॉस्पिटलवर होईल.
रुग्णालयातील बहुतांश सेवा या बंद राहतील
या काळात सर्व आवश्यक सेवा सुरु असतील.
जखमी रुग्णांवर उपचार करण्यात येतील, परंतु नियमीत ओपीडी आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया होणार नाहीत. (Doctors Strike)
IMA चे अध्यक्ष काय म्हणाले ?
ज्या मुलीसोबत ही घटना घडली ती मध्यमवर्गीय कुटुंबातील एकुलती एक मुलगी असल्याचे आयएमएचे अध्यक्ष म्हणाले. ही घटना कोणी एका व्यक्तीने घडवली नसून अनेक लोक यात सामील आहेत. ज्या पद्धतीने तिची हत्या झाली त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे ते म्हणाले. रुग्णालयात सुरक्षित नसल्याची चिंता डॉक्टर आणि परिचारिकांना आहे, तसेच त्यांचे कुटुंबीयही चिंतेत आहेत. मी आता सीबीआयच्या तपास रिपोर्टची वाट बघतोय असं त्यांनी म्हंटल.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात नेण्याच्या सूचना दिल्या आहेत. गरज पडल्यास आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं ममता बॅनर्जी यांनी म्हंटल. तसेच या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या लोकांचा राज्य सरकारवर विश्वास नसेल तर ते इतर कोणत्याही तपास यंत्रणेशी संपर्क साधू शकतात.असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या