राखी सावंतचं लग्न तिसऱ्यांदा मोडलं; पाकिस्तानी अभिनेत्याने मारली पलटी

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राखी सावंत नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याच्या विविध घटनांमुळे चर्चेत असते. ती ‘ड्रामा क्वीन’ म्हणूनही ओळखली जाते , तिच्या आयुष्यामध्ये ड्रामा थांबण्याचे नाव घेत नाही. सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, राखी सांवत तिसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होती. पण , लग्न होण्याआधी हे लग्न मोडलं आहे. राखी सावंतच्या आयुष्याची घडी बसण्याआधीच पुन्हा एकदा फिस्कटली आहे. तर हि नक्की घटना काय आहे , हे आज आपण पाहणार आहोत. तर चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

डोडी खानने लग्नाला नकार दिला –

पाकिस्तानी अभिनेता डोडी खानने राखी सावंतला लग्नासाठी प्रपोज केले होते, आणि हे दोघे लवकरच लग्न करणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण आता डोडी खानने लग्नाला नकार दिला आहे, आणि यामुळे राखीच्या आयुष्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. डोडीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली.

डोडीचा व्हिडीओ व्हायरल –

डोडीने व्हिडीओमध्ये सांगितले की, “मी राखीला खूप चांगलं ओळखतो आणि तिच्याबद्दल माझ्या भावना खूप सकारात्मक आहेत. पण मी तिला प्रपोज केल्यावर माझ्या आयुष्यावर होणाऱ्या टीकेची आणि दबावाची मला कल्पनाही आहे. त्यामुळे, मी तिला प्रपोज करणं योग्य नव्हतं आणि माझ्या निर्णयामुळे राखीला दु:ख होईल हे मी जाणतो. राखी, तू माझ्या खूप चांगल्या मैत्रीण आहेस, पण मी लग्न करणार नाही.” असे त्याने म्हंटले आहे.

पूर्वीचा पती रितेशची या व्हिडीओवर कमेंट –

डोडीच्या या खुलाशावर राखीने सोशल मीडियावर तात्काळ प्रतिक्रिया दिली. तिने रडणारे आणि हृदयद्रावक इमोजी पोस्ट करून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. राखीचा पूर्वीचा पती रितेशची हि या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, “राखी, ही तुझी निवड होती, जो स्वतःसाठी भूमिका घेऊ शकत नव्हता, तो तुझी साथ काय देणार?” डोडीच्या नकारामुळे राखीच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठं उलथापालथ झाली आहे, आणि तिच्या भावनांमध्ये गोंधळ उडाल्याचं दिसतं.