चपातीला तूप लावून खाल्ल्याने खरंच वजन वाढत की कमी होतं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संस्कृतीत तूप (Ghee) हे एक मुख्य खाद्य आहे. त्यामुळे कोणताही गरम पदार्थ असो त्यावर तूप लागतच. परंतु तुपामुळे अधिक वजन वाढते आणि आपला फिटनेसही योग्यरित्या राहत नाही. त्यामुळे मग तूप खान सोडायचं का? तर नाही. तुपामुळे वजन वाढत नाही तर घटते असं जर तुम्हाला म्हणलं तर तुम्हाला ते पटणार नाही. पण होय, तुम्ही जर पोळीला, भाकरीला तूप लावून खात असाल तर तुमचं वजन वाढणार नाही. ते कस ते जाणून घेऊ.

साजूक तुपाच्या सेवनामुळे वजन कमी :

१) पोळीला तूप लावल्यानंतर पोळीतील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. आणि वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

२) तुपातील सीएलए काही लोकांचे वजन कमी करते असे दिसून आले असले तरी ते कॅलरी-दाट आणि चरबीयुक्त अन्न देखील आहे. त्याचे आरोग्यदायी फायदे असूनही, जास्त प्रमाणात तूप खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो.

३) साजूक तुपामध्ये पर्यायचा विचार केला तर गाईच्या तुपात कॅल्शियम, मिनरल्स आणि असे अनेक घटक असतात जे वजन कमी करण्याचे काम करतात.

४) त्याचबरोबर गायीच्या तुपाचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. कारण तुपात ब्युटिरिक ॲसिड असते जे आतड्यांना मजबूत करण्याचे काम करते आणि कोलेस्ट्रॉल कमी करते.त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होतो.

साजूक तुपामुळे त्वचा निखारते :

गायीच्या तूपात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढून त्वचेला चमक आणण्याचे काम करतात. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात साजूक तुपाचा वापर केल्यास तुमच्या त्वचेशी संबंधित समस्या दूर होतील. त्वचेला नवा निखार येऊन तुमची त्वचा आणखी चमकदार बनेल .

रोगप्रतिकार क्षमता वाढते :

साजूक तुप हे विविध जीवनसत्वानी समृद्ध असते . तुपामध्ये अ, ड, इ आणि क जीवनसत्व भरपूर असते . जे तुमची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात . तसेच तुपातील अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकार वृद्धीस मदत करेल .