कोविड लसीमुळे हृदयविकाराचा झटका खरचं येतो का? आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कोरोना महामारीनंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये मोठा फरक पडलेला पाहिला मिळत आहे. यात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णाच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. खूप कमी वयामध्ये लोकांचे हृदयविकारामुळे मृत्यू होत आहेत. त्यामुळेच कोविड लसीमुळे (Covid Vaccine) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येत असल्याची भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच याबाबतची सत्य माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री (Mansukh L. Mandaviya) यांनी दिली आहे.

कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांना डॉक्टरांकडून कोविडल्यास घ्या असा सल्ला देण्यात येत होता. त्यामुळे सरकारने कोविड लसीकरणाची ही मोहीम संपूर्ण देशभरात राबवली. परंतु आता कोविड महामारी टळल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्यामुळे लोकांचा मृत्यू सर्वाधिक होऊ लागला आहे. मात्र आता कोरोना व्हायरस आणि हृदयविकाराचा काहीही संबंध नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. ICMR ने आज म्हणले आहे की, कोविड लसीकरणामुळे हृदयविकाराचा धोका वाढत असल्याचे अद्याप एकही कारण समोर आलेले नाही.

याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या माहितीला दुजोरा देत सांगितले आहे की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने या विषयावर सविस्तर अभ्यास केला आहे. यामध्येच हृदयविकाराचा झटका आणि कोविड लसीचा काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे. कोविड लसीमुळे हृदयविकाराचा धोका वाढवत ही नाही आणि झटका कमी ही होत नाही, त्यामुळे या सर्व अफवांवर विश्वास ठेवू नका. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या या माहितीमुळे अनेकांच्या मनातील भीती निघून गेली आहे.

दरम्यान, बदलते हवामान, बदलते दैनंदिन जीवन , धावपळ, प्रदूषण अशी अनेक कारणे हृदयविकाराचा झटका येण्यासाठी जबाबदार ठरत आहेत. प्रत्येक व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्यामागे वेगळे कारण सांगितले जात आहे. यात अतिरिक्त ताणतणाव हे देखील प्रमुख कारण ठरत आहे. मात्र हृदयविकाराचा झटका आणि कोविड लसीचा काहीही यामध्ये संबंध नाही.