डोळ्यांनी जवळचं अंधूक दिसतंय? हे 5 घरगुती उपाय केल्यास समस्या होईल दूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सतत लॅपटॉपवर काम करावे लागत असल्यामुळे तरुणांमध्ये नंबरचा चष्मा लागण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय आणि व्यायाम करण्याची तितकीच आवश्यकता आहे. हे व्यायाम नेमके कोणते असायला हवेत आणि त्याचा डोळ्यांना कसा फायदा होईल याविषयी जाणून.

दृष्टी वाढवण्यासाठी करा हे उपाय

1) 20 – 20 – 20 चा नियम वापरा – लॅपटॉप वर किंवा मोबाईलवर काम करताना दर 20 मिनिटांनी आणि 20 सेकंदांनी आपली नजर दुसरीकडे फिरवावी. टीव्ही किंवा कोणतीही वस्तू 20 ते 25 फूटावरुन पहावी. ही कृती केल्यास नंबरचा चष्मा लवकर दूर होईल.

2) न्यूट्रिशन – डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे, हिरव्या पालेभाज्या, अंडी, नट्स, ड्रायफ्रूट्सचे सेवन करावे. डाएटमध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि झिंकसारख्या पोषक तत्वांचा ही समावेश करावा. यामुळे चष्म्याचा नंबर दिवसेंदिवस कमी होऊन जाईल

3) एक्सरसाइज करावी – एखाद्या वस्तूकडे एकटक बघणे, डोळे फिरवणे, डोळे बंद करून बुबुळं फिरवणे अशा एक्सरसाइज सर्वात जास्त फायदेशीर ठरू शकतात. एक्सरसाइज केल्यामुळे डोळ्यांच्या क्रियांना अधिक चालना मिळते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

4) गुलाबजल डोळ्यात टाका – सकाळी झोपेतून उठल्यानंतर आवळ्याच्या पाण्याने डोळे स्वच्छ धुऊन घ्या. किंवा रात्री झोपताना डोळ्यांमध्ये गुलाबजल टाका. असे केल्यास याचा लवकरच चांगला परिणाम दिसून येईल.

5) चुकीच्या सवयी मोडा – अंधारात फोन वापरणे, तासंतास गेम खेळत बसणे, मोबाईल टीव्ही खूप जवळून पाहणे अशा अनेक कारणांमुळे डोळ्यांना लवकर चष्मा लागू शकतो. या सर्व सवयी लवकर मोडल्यास चष्मा लागल्याची समस्या दूर होईल.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी हा उपाय करा

सर्वात प्रथम एक पेन्सिल घ्या. तिच्या मधल्या भागावर कोणतेही अक्षर लिहा. त्यानंतर ही पेन्सिल हाताने डोळ्यांसमोर काही अंतरावर ठेवा आणि तुम्ही दिलेल्या अक्षरावर किंवा खुणेवर फोकस करा. आता पेन्सिल हळूहळू नाकाच्या दिशेने आणा आणि आपला फोकस कायम ठेवा. हीच कृती चार ते पाच वेळा करून पहा.