डोंबिवलीच्या तरुणाचा विश्वविक्रम ! 61 दिवस दररोज धावला 42 किलोमीटर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – डोंबिवलीच्या एका तरुणाने विश्वविक्रमाला (young guy break world record) गवासनी घातली आहे. यामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय विशाल स्वामी या तरुणाने तब्बल 61 दिवस दररोज 42 किलोमीटर धावून मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर (young guy break world record) केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याच्या या विक्रमाची दखल घेतली आहे. हे यश मिळताच आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी स्वतः हजेरी लावून त्याला शुभेच्छा दिल्या. या आधी सलग 60 दिवस दररोज 42 किलोमीटर धावण्याचा विक्रम एका भारतीयाच्या नावावर होता. आता विशालने तो मोडून आपल्या नावावर केला आहे.

विशाल स्वामी हा 29 वर्षीय तरुण डोंबिवली स्टार कॉलनी मध्ये आपली आई, वडील बहिणीसह राहतो. विशाल हा मूळचा केरळचा आहे. मात्र, त्याचं कुटुंब नोकरी धंदा निमित्त डोंबिवलीत स्थायिक झाले. विशाल एका खासगी विमा कंपनीत काम करतो. त्याची कंपनी बंगलोरला असल्याने तो सध्या वर्क फ्रॉम होम करत आहे. गेल्या सात वर्षापूर्वी विशालला धावण्याची आवड निर्माण झाली आणि विशालने धावायला सुरुवात केली. यानंतर त्याने धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पदकसुद्धा जिंकले.

दररोज पहाटे तीन वाजता विशाल डोंबिवली क्रीडा संकुल गाठायचा आणि धावणं सुरू करायचा. तीन वाजेपासून सुरू झालेलं त्याचं धावणं आठ वाजेपर्यंत सुरूच असायचं. सलग पाच तास न थांबता विशाल धावत होता. विशाल 42 किलोमीटर धावत होता. सातत्याने 61 दिवस दररोज 42 किलोमीटर धावून त्याने या विश्वविक्रमाला गवसणी घातली. विश्वविक्रमाला गवासनी (young guy break world record) घातल्यानंतर विशालचे डोंबिवलीकरांनी ढोल ताशांच्या गजरात त्याचे स्वागत केले. यानंतर डोंबिवली शहरातील विविध सामाजिक संस्था, शिंदे गट उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, काँग्रेसचे संतोष केणे यांच्यासह राजकारणी मंडळी तसेच महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी देखील विशालची भेट घेऊन त्याचा जाहीर सत्कार केला.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!