व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

IOC देणार घरगुती CNG -PNG कनेक्शन; LPG च्या किमतीपासून होणार सुटका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेली कित्येक दशकं एलपीजी गॅसचा (LPG Gas) वापर करण्यात येत आहे पण भविष्यातील एलपीजी गॅसची उपलब्धता आणि सध्या एलपीजी गॅसच्या गळतीमुळे होणारे अपघात लक्षात घेता सतत वाढणारे हे अपघात थांबवण्यासाठी सीएनजी आणि पीएनजी गॅस सिलेंडर एक उत्तम पर्याय ठरू शकते . त्यामुळे भारतातील जनतेला एलपीजी सिलेंडर च्या त्रासातून लवकरच मुक्त करण्याचा निश्चय IOC ने केला आहे. त्याचाच भाग म्हणजे देशातील 1 कोटी 50 लाख जनता LPG मुक्त करत CNG -PNG कनेक्शन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

स्वस्त आणि सुरक्षित –

भारतीय सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल भारतातील घरांमध्ये लवकरच सीएनजी आणि पीएनजी कनेक्शन सुरू करणार आहे. हे कनेक्शन लवकरात लवकर देशभर जोडण्यात येतील . सुरुवातीला एक कोटी पन्नास लाख लोकांच्या घरी सीएनजी आणि पीएनजी कनेक्शन देण्याची तयारी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने केली आहे . LPG सिलेंडरच्या तुलनेत सीएनजी आणि पीएनजी कनेक्शन ग्राहकांसाठी फायद्याचे ठरू शकते याचे मुख्य कारण म्हणजे हे दोन्ही इंधन एलपीजी गॅसच्या तुलनेत 30 टक्क्यांहून कमी दरात उपलब्ध होऊ शकतात .

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ने तामिळनाडूमधील एअर बायोटेक्नॉलॉजी सोबत एक प्लांट तयार केला आहे जिथे सीएनजी सिलेंडरची टेस्टिंग युनिट लावण्यात आले आहे . LPG व मोटर्स प्स्प्रिंट च्या तुलनेत सीएनजी आणि पीएनजी गॅस अधिक सुरक्षित आहे. हे गॅस हवेपेक्षा हलके असल्याने कुठल्याही प्रकारची गळती झाल्यास लगेच हवेत विरून जाते

IGL वर CNG चे रेट

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र- 73.59/- प्रति kg
नोएडा-77.20/- प्रति kg
ग्रेटर नोएडा-77.20/- प्रति kg
गाझियाबाद- 77.20/- प्रति kg
मुजफ्फरनगर-81.58/- प्रति kg
मेरठ- 81.58/- प्रति kg
श्यामली- 81.58/- प्रति kg

IGL वर PNG रेट-

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र-48.59/- प्रति एस सी एम
नोएडा-48.46/- प्रति एस सी एम