Dominos : ‘नाकात बोट घातलं आणि पिठाला पुसलं..’; डॉमिनोजच्या कर्मचाऱ्याचं घाणेरडं कृत्य

Dominos
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dominos) बर्थडे पार्टी असो किंवा बॅचलर पार्टी अशा ठिकाणी पिझ्झा तर असतोच. आजकाल तरुणांमध्ये पिझ्झाचं क्रेझ प्रचंड आहे. फास्टफूडमध्ये टॉप फुड्समध्येदेखील पिझ्झाचा समावेश आहे. हा असा पदार्थ आहे जो एखाद्या रेस्टोरंट किंवा हॉटेलच्या मेन्यूची देखील शोभा वाढवतो. आपल्या देशात पिझ्झा विक्री करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. ज्यांपैकी एक म्हणजे डॉमिनोज. अनेक लोक मोठ्या आवडीने डॉमिनोजचा पिझ्झा खातात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून पुन्हा कुणी डॉमिनोजचा पिझ्झा खाईल असे वाटत नाही.

कोणताही अन्न पदार्थ बनवताना स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. मात्र सगळीकडे हे स्वच्छतेचे नियम पाळले जातात का? तर हा व्हिडीओ पाहून तुम्हाला याच उत्तर काही सेकंदातच मिळेल. (Dominos) सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ जपानमधील आहे. जपानच्या टोकियो शहरातील डॉमिनोज शॉपमधील एका कर्मचाऱ्याचा हा व्हिडीओ आहे. ज्याचे कृत्य अत्यंत किळसवाणे असून यावर अनेक नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. इतकेच नव्हे तर अनेक नेटकऱ्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत कारवाईची मागणी केली आहे.

काय आहे व्हिडिओत? (Dominos Pizza Maker)

या व्हिडिओत आपण पाहू शकतो, डॉमिनोजच्या शॉपमध्ये एक कर्मचारी आपल्या नाकात बोट घालतो आणि त्यानंतर पिझ्झाच्या मळलेल्या पीठाला तेच बोट पुसतो. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. (Dominos) या प्रकारामुळे नक्कीच डॉमिनोजच्या प्रतिष्ठेला मोठा फटका बसणार आहे. या प्रकारची डॉमिनोजने गंभीर दखल घेतली असून माफीदेखील मागितली आहे. एका वृत्तानुसार, हा कर्मचारी पार्टटाईम वर्कर असून या प्रकरणी त्याच्यावर कामगार कायद्यानुसार कारकाई करण्यात येणार आहे.

तसेच डॉमिनोजने अमागास्की सीटीतल ह्युगो प्रिफेक्टर शॉप तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्याने हे किळसवाणे कृत्य रात्री २ वाजण्याच्या सुमारास केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी डॉमिनोजने म्हटले, ‘कर्मचाऱ्याने मळलेले पीठ टाकून देण्यात आले आहे. तसेच अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. आमच्या बहुमूल्य ग्राहकांना असहज केल्याप्रकरणी आम्ही त्यांची माफी मागतो. संस्थेत सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाते. स्वच्छतेबाबत आम्ही पूर्णपणे बांधील आहोत’. (Dominos)