Donald Trump On Covid: कोरोनाची उत्पत्ती कशी झाली? ट्रम्प यांचा धक्कादायक खुलासा

0
2
Donald Trump On Covid
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Donald Trump On Covid – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या या निर्णयांची प्रतिक्रिया एकसारखी नसल्यानं त्यांना विरोधही झाला. मात्र, काही निर्णयांमुळे जागतिक स्तरावर मोठे परिणाम दिसून आले. त्याचप्रमाणे, ट्रम्प यांच्या नव्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अमेरिकेतील सरकारी गुप्तचर यंत्रणा, सीआयएने एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे, जो चीन आणि संपूर्ण जगासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तर चला याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

Corona Virus बाबत सीआयएचा दावा –

सीआयएच्या (Central Intelligence Agency) दाव्यानुसार, कोरोना विषाणूचा (Corona Virus) उदय नैसर्गिकपणे झालेला नाही, तर तो प्रयोगशाळेतील लीकमुळे पसरला आहे . ट्रम्प यांनी यापूर्वीच कोरोना विषाणूला ‘चिनी विषाणू’ म्हणून संबोधले होते, आणि आता पुन्हा एकदा अमेरिकेने चीनवर गंभीर आरोप केले आहेत. सीआयएचा दावा आहे की, कोरोना विषाणू जाणीवपूर्वक तयार केला गेला आणि प्रयोगशाळेतून बाहेर पडला. (Donald Trump On Covid)

कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा प्रश्न (Donald Trump On Covid) –

या अहवालावर चीनच्या वतीने प्रतिक्रिया देत त्याला राजकीयदृष्ट्या प्रेरित ठरवले गेले आहे. चीनच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य न दिल्यामुळे, कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा प्रश्न अनुत्तरितच (Unanswered) राहील अशी चिंता गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केली आहे. तसेच, सीआयएच्या या दाव्यांवर कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत.

नवीन दाव्यामुळे खळबळीचे वातावरण –

अहवाल तयार करण्यासाठी बायडेन प्रशासन आणि सीआयएचे (Central Intelligence Agency) माजी संचालक विल्यम बर्न्स यांनी सहकार्य केले होते. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्त केलेले सीआयए संचालक जॉन रॅटक्लिफ यांच्या विनंतीवरून हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला. कोरोना विषाणूच्या उत्पत्तीच्या या नवीन दाव्यामुळे जागतिक स्तरावर असमाधान निर्माण होणार आहे.

हे पण वाचा : पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील तापमानात होणार बदल ; हवामान विभागाचा अंदाज पहाच

पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील तापमानात होणार बदल ; हवामान विभागाचा अंदाज पहाच