मुथा फौंड्रीजकडून सामाजिक संस्थाना 25 लाखांची देणगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | मुथा फौंड्रीज येथे दरवर्षी 26 जुलै हा दिवस स्वर्गीय विजया मुथा यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 25 जुलै 2022 रोजी ती साजरी करण्यात आली. सर्व कामगार व कर्मचारी त्यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील विविध उपक्रम करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार महेश शिंदे व एस.पी. अजयकुमार बन्सल हे उपस्थित होते. स्व. विजया मुथा यांच्या पुण्यतिथीनिमित्त 25 लाख रूपयांची देगणी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांना देण्यात आली.

यावेळी सर्वउत्कृष्ठ कामगार व कर्मचारी 2019-2020 व 2021- 2022 पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांच्या पाल्यालाचाही सन्मान करण्यात आला, याच बरोबर सीएसआर मार्फत विविध क्षेत्रात देणग्या देखील देण्यात आल्या. त्यामध्ये ज्ञानप्रभोदिनी शाळेला 1 लाख रुपये, आर्यांग्ल हॉस्पिटल 3 लाख रुपये आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला कास परिसरात शैचालाय बांधण्यास 15 लाख रुपयेची देणगी देण्यात आली. कार्यक्रम नंतर रक्तदान शिबीराचे नियोजन करण्यात आले. त्या मध्ये मोठ्या प्रमाणात कामगार व कर्मचारी यांचा सहभाग होता. एकूण 55 लोकांनी रक्तदान केले. तसेच एहसास स्कूल, पुरुष भिक्षेकरीगृह, निरीक्षणगृह, आशाभवन, वासोळे शाळा, एम आय डी सी परिसरातील शाळांमध्ये आणि आर्यांगल हॉस्पिटल या ठिकाणी खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी मास पदाधिकारी, एम आय डी सी परिसरातील विविध कंपन्यांचे पदाधिकारी, मुथा कामगार संघटनेचे पदाधिकारी, संचालक अनुप मुथा, सौ. प्रमिला अजीत मुथा, सौ. मेघना जयदीप बाफना, सौ. रिचा अनुप मुथा व सर्व मुथा कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आ. महेश शिंदे यांनी उद्योगवाढीसाठी व भविष्यात येणाऱ्या अडचणींन विषयी मार्गदर्शन केले. कंपनी व कामगार यांच्या अडचणी प्रामुख्यने सोडवून सातारा एम आय डी सी मध्ये जास्तीत जास्त रोजगार व उत्पादन निर्मितसाठी लागणारी सर्वप्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच राजकीय दहशत खाली काम न करता जे योग्य आहे, त्याला प्रोत्साहन देऊन पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

सातारा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी सर्व रक्तदान कर्त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाची प्रस्तावना चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर अजीत मुथा यांनी केली. मनुष्यबळ व्यवस्थापन प्रमुख शकुंतला पवार यांनी मुथा फौंड्रीजचा सीएसआरचा आढावा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल देशमुख व प्रियांका लवंगारे यांनी केले. आभार व्यवस्थापकीय संचालक जयदीप बाफना यांनी मानले.