दिवाळी पूजनात चुकूनही करू नका ‘या’ चुका! घरात टिकणार नाही सुख-समृद्धी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाची दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी रविवारी देशभरात धुमधडाक्यात साजरी केली जाणार आहे. दिवाळी सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, दिवाळीचा दिवस खूप शुभ असतो. या दिवशी माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. दिवाळीत नियमानुसार, पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर ठेवते. परंतु, याच पूजेदरम्यान आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे दिवाळी पूजना दरम्यान पुढील चूका कधी ही करायला जाऊ नका.

1 दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या पूजेचे विशेष महत्त्व असते. अशा परिस्थितीत प्रार्थनास्थळ आणि घराची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक असते. असे मानले जाते की, ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा प्रवेश होतो. त्यामुळे पूजेच्या दिवशी घर आणि प्रार्थनास्थळ स्वच्छ असले पाहिजे.

2 दिवाळीच्या दिवशी कोणतीही जुनी किंवा रद्दी वस्तू घरात ठेवू नका. असल्या वस्तू नकारात्मकता पसरवतात. दिवाळीत घरात तुटलेली घड्याळे, तुटलेल्या बाटल्या, आरसे, जुने कपडे, इतर रद्दी देखील ठेवू नका. ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे तेथील परिसर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवा.

3 दिवाळीच्या रात्री पूजा करताना चुकूनही जुने किंवा फाटलेले कपडे घालू नका. तुम्ही असे करत असाल तर लगेच बदला. खरे तर फाटलेले कपडे हे गरिबीचे लक्षण मानले जाते. यात तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा करत असाल तर स्वच्छ आणि निर्मळ कपडे घाला. पूजा करताना रंगांचेही ध्यान ठेवा, पूजा करतेवेळी काळे कपडे घालू नका.

4 दिवाळीच्या दिवशी खाण्यापिण्याचीही विशेष काळजी घ्यावी. दिवाळीच्या दिवशी चुकूनही मांस, मासे, दारू इत्यादींचे सेवन करू नका. अशा गोष्टी केल्यामुळे तुम्हाला नैराश्य जाणवेल तसेच घरातील आनंदी वातावरण विस्कळीत होईल.

5 दिवाळी दिवशी पूजा केल्यानंतर घर एकटे सोडून घराला कुलूप लावून कोठेही बाहेर जाऊ नका. पूजेच्या वेळी संपूर्ण घर दिवे आणि दिव्यांनी प्रकाशित करा. कोणत्याही कोपऱ्यात अंधार नसावा. घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा जेणेकरून देवी लक्ष्मी प्रवेश करू शकेल. रात्रीच्या वेळी देखील घरातील दिवे बंद करू नका.

6 दिवाळी पूजेसाठी गणपतीची मूर्ती उभ्या स्थितीत नसून बसलेल्या स्थितीत असावी. तसेच सोंड उजव्या बाजूला नसावी हे लक्षात ठेवा. पूजेत लाल रंगाच्या फुलांचा वापर करा. गणेशाची पूजा करून दिवाळी पूजेला सुरुवात करा. दिवाळीच्या दिवशी श्री गणेशा आणि लक्ष्मी मातेला पहिला नैवेद्य ठेवा.