कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता!! लवकरच कशेडी बोगद्यातील दुहेरी वाहतूक होणार सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उन्हाळ्यामध्ये कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. लवकरच मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai – Goa Highway) कशेडी बोगद्यातून (Kashedi Tunnels) दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात येत्या 1 मे रोजी अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यंदा कोकणात जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. तसेच त्यांचा कोकण प्रवासही सुसाट होईल.

सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे शहरात काम करणारे अनेक लोक मतदानासाठी आपआपल्या गावी जात आहेत. यात मुंबईतील कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचाही समावेश आहे. याचं मतदारांची कोकणाकडे येताना गैरसोय होऊ नये म्हणून भुयारी मार्गातून पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाहतूक सुरू करण्याबाबतचे संकेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे कोकण प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाचे म्हणजे, भुयारी मार्गातून पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आल्यानंतर कोकणवासियांना अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये कशेडीचे घाट अंतर भोगद्यावाटे कापता येणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेमध्ये मोठे बचत होईल. दरम्यान, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरीलवरील कशेडी घाटाला पर्यायी असणाऱ्या भुयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यात कशेडी घाटात बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यांवर दिशा फलक लावले नसल्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना कशेडी टॅपमार्गे खेडकडे रवाना व्हावे लागते. त्यामुळे त्यांचा प्रवासात अधिक वेळ जातो.