Download Driving License on WhatsApp । मित्रानो, बाहेर कुठं गाडीवरून फिरायचं म्हंटल तर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स अत्यंत गरजेचं आहे. परंतु कधी कधी घाईगडबडीत आपण ड्रायविंग लायसन्स घरीच विसरतो आणि बाहेर मग ट्राफिक पोलिसांनी अडवल्यानंतर चांगलाच दंड भरावा लागतो. पण आता चिंता करू नका, आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत त्यामाध्यमातून तुम्ही WhatsApp वरून तुमचं ड्रायविंग लायसन्स डाउनलोड (Download Driving License on WhatsApp) करू शकता. आणि फक्त ड्रायविंग लायसन्सच नव्हे तर आरसी, पॅन कार्ड आणि विमा पॉलिसी यांसारखी कागद्पत्रही तुम्ही मोबाईल वरूनच मिळवू शकता.
फॉलो करा या स्टेप्स – Download Driving License on WhatsApp
सर्वात आधी तुम्हाला Google वर MyGov Helpdesk लिहून सर्च करावे लागेल.
यानंतर तुम्हाला येथे डिजीलॉकर सेवेचा लाभ मिळेल.
तुम्हाला याठिकाणी 9013151515 WhatsApp क्रमांक मिळेल. हा नंबर कॉपी करून तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा.
यानंतर तुम्ही तुमची कागदपत्रे कधीही डाउनलोड करू शकता. (Download Driving License on WhatsApp)
तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅपवरील चॅट विभागात जाऊन 9013151515 या नंबरवर “HI” आणि “नमस्ते” संदेश पाठवावा लागेल.
यानंतर तुम्हाला एक OTP मिळेल. हा OTP चॅटबॉक्समध्ये पाठवा. या प्रक्रियेनंतर तुमची सर्व कागदपत्रे येतील.
कोणकोणती कागदपत्रे मिळतील-
ड्रायविंग लायसन्स
पॅन कार्ड
दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC)
विमा पॉलिसी – दुचाकी
दहावीचे मार्कशीट
बारावीचे मार्कशीट
विमा पॉलिसी दस्तऐवज