औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठतील मनुष्यबळ विकास केंद्रात 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये 20 कोर्सेसला मान्यता मिळाली आहे. वर्षभरातील अभ्यासवर्ग या वेळेसही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अशी माहिती संचालक डॉ. एन. बांदेला यांनी गुरुवारी दिली.
गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्व कोर्स ऑनलाईन घेण्यात आले. विद्यापीठात तीन दशकांपासून एचआरडीसी सुरु आहे. विद्यापीठाणे 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी विविध कोर्सचा प्रस्ताव दाखल केला होता. यातील 20 कोर्सला मान्यता मिळाली. 9 रिफ्रेशर कोर्स, चार फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम, 4 शॉर्टटर्म कोर्स, प्राचार्याची कार्यशाळा, अधिकऱ्यांसाठी कार्यशाळा, नवीन शैक्षणिक धोरण-2020 वर परिसंवाद आदीचा समावेश आहे.
या वर्षी भरतीय साहित्याचा तैलनिक अभ्यास, जागतिक अध्ययन, ई-गव्हर्णन्स, ई – लर्निंग, मानवी हक्क व सामाजिक सर्वसमावेशिकरण, पर्यावरणाचा अभ्यास आणि शाश्वत विकास, शिक्षक अद्यापन, आपत्ती व्यवस्थापन व लिंगभवात्मक अभ्यास या विषयावर उजळणी वर्ग होतील तसेच संशोधन पद्धतीवर शॉर्ट टर्म कोर्स होईल. सोबतच गुणवता विकास, नेतृत्वगुण क्षमता, भौतिक बदल कृतिम गुणवता, डाटा ऑनलिसीस, योगा आदी विषयांवर वेबिनार होणार आहेत.