Dream 11 | ड्रीम 11 मुळे कोल्हापूरच्या फळ विक्रेत्याच नशीब फळफळल! फक्त 59 रुपयात बनला करोडपती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Dream 11 | नुकतेच आयपीएल 24 सुरू झालेले आहे. यावर्षी खूप जल्लोषात आयपीएलची सुरुवात झालेली आहे. आयपीएल सुरू झाली की, सगळेजण आपोआपच ड्रीम 11 कडे वळतात. ड्रीम 11 वर पैसे लावून आपण देखील चांगले पैसे कमवावे असे प्रत्येकाला वाटत असते. आणि त्यासाठी अनेक प्रयत्न देखील करत असतात. अशातच कोल्हापूरच्या एका केळी विक्रेत्याने ड्रीम 11 वर बाजी मारलेली आहे. पहिल्याच मॅचमध्ये त्याने तब्बल एक कोटी रुपये जिंकलेले आहे. अनेक लोक या ड्रीम 11 ला जुगार म्हणतात. पण हा जुगार खेळून या केळी विक्रेताने आता एक कोटी जिंकलेले आहेत.

कोल्हापूरमधील शुभम धनाजी कुंभार असे या व्यक्तीचे नाव आहे. तो व्यवसायाने केळी विक्रेता आहे आणि ड्रीम 11 ( Dream 11) मध्ये त्यांनी टीम लावून 1 कोटी रुपये जिंकले आहे. गेल्या 4 ते 5 वर्षापासून तो ड्रीम 11 वर खेळत होता. त्याला कधीच वाटले नव्हते की, आपण कोट्यावधीचे मालक होऊ शकू. परंतु त्याचे हे स्वप्न आता पूर्ण झालेले आहे.

शुभमचे आई-वडील हा 1988 पासून फळ विक्रीचा व्यवसाय करत आहेत. शुभम कुंभार हा कोल्हापुरात कृषी उत्पादन बाजार समितीचे समोर केळी आणि फळांच्या विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचे वडील देखील त्याच्यासोबत असतात.

आयपीएल 2024 च्या पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी ड्रीम 11 वर त्याची टीम लावली. आणि त्याला मोठा जॅकपॉट लागला. त्यात त्याने 1 कोटी रुपये जिंकलेले आहे. ड्रीम 11 हे ॲप एका जुगाराच्या प्रकारामध्ये येते. त्यामुळे अनेकजण तुम्हाला याची सवय लागू शकते. आर्थिक नुकसान होणार नाही येत हा निर्णय घेऊनच खेळ असा सल्ला देत असतात परंतु अनेकजण या ड्रीम 11 वर त्यांची टीम लावत असतात महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक लोक ड्रीम 11 वर करोडपती झालेले आहे.

आयपीएलच्या काही मोठे बदल केलेले आहे. यावेळी दोन्ही ॲप्सने खास ऑफर ठेवलेली आहे. ॲपमध्ये तुम्हाला 11 खेळाडूंची एक टीम लावावी लागते. म्हणजे समजा जर चेन्नई आणि मुंबईची मॅच असेल तर या दोन्ही टीममधील कोणता खेळाडू चांगला खेळू शकतो हे पाहून तुम्हाला टीम तयार करावी लागेल.

शुभमने यावर्षी ड्रीम 11 वर पहिल्याच मॅचमध्ये 11 जणांनी टीम लावून तो करोडपती झालेला. या ड्रीम इलेव्हनमध्ये क्रिकेट सामना सुरू होण्याआधी व्हर्च्युअल टीम तयार करून त्यावर पैसे लावावे लागतात. यावेळी मॅच सुरू असताना वर्चुअल टीममधून खेळाडूचे पॉईंटचे प्रत्यक्ष सुरू असलेल्या सामन्यातील खेळाडूंनी केलेल्या प्रदर्शनावर मिळत असतात. हीच एक मोठी जोखीम घेऊन आता यावर्षी कोल्हापूर मधील हा फळ विक्रेता करोडपती झालेला आहे.