व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

BCCI ची मोठी घोषणा!! Dream 11 कंपनी टीम इंडियाची मुख्य Sponsor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट बोर्ड BCCI ने मोठी घोषणा केली आहे. भारतातील सर्वात मोठे स्पोर्ट गेम प्लॅटफॉर्म असलेली ड्रीम 11 कंपनी आता टीम इंडियाची मुख्य प्रायोजक असणार आहे . आतापर्यंत टीम इंडियाच्या जर्सीवर BYJU चा लोगो दिसत होता. परंतु आता इथून पुढे BYJU ऐवजी Dream 11 चा लोगो भारतीय संघाच्या जर्सीवर असणार आहे. भारतीय संघ काही दिवसांत वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे, त्यासाठी खेळाडूंच्या जर्सीवर Dream 11 चा लोगो असणार आहे. BCCI ने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

ड्रीम11 सोबतच्या या पार्टनरशिप नंतर BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, “मी ड्रीम11 चे अभिनंदन करतो आणि भारतीय क्रिकेट बोर्डात त्यांचे स्वागत करतो. BCCI चे अधिकृत प्रायोजक असण्यापासून ते आता मुख्य प्रायोजक होण्यापर्यंत, BCCI -Dream11 भागीदारी मजबूत होत गेली. ही भागीदारी म्हणजे भारतीय क्रिकेटबद्दल असलेल्या विश्वास, मूल्य, क्षमता आणि वाढीचा पुरावा आहे. आम्ही या वर्षाच्या अखेरीस ICC विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याची तयारी करत असताना, चाहत्यांचा अनुभव वाढवणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

दरम्यान, या या भागीदारीबद्दल ड्रीम स्पोर्ट्सचे सह-संस्थापक आणि सीईओ श्री हर्ष जैन यांनीही प्रतिक्रिया देत म्हंटल कि, BCCI आणि टीम इंडियाचे दीर्घकाळ पार्टनर म्हणून, Dream11 आमची ही पार्टनरशिप आणखी पुढच्या लेव्हल वर घेऊन जाण्यास उत्सुक आहे. Dream11 च्या माध्यमातून आम्ही क्रिकेट वरील आमचे प्रेम अब्जावधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना शेअर करत असतो. त्यातच आता भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रायोजक होणं ही नक्कीच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.