व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Dream 11 मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Dream 11 हे मोबाईल गेमिंग अ‍ॅप तुम्हाला नक्कीच माहित असेल. या अँपच्या माध्यमातून अनेकजण करोडपती झाल्याचेही तुम्ही ऐकलं असेल. तुम्ही सुद्धा ड्रीम 11 मध्ये पैशाची गुंतवणूक करून आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला असेल. परंतु आता तुम्हाला थेट ड्रीम 11 मध्ये नोकरी करण्याची संधी मिळत आहे. होय, हे खरं आहे. ड्रीम 11 ही कंपनी असोसिएट मॅनेजर व बिझनेस अ‍ॅनॅलिटिक्स या पदासाठी अनुभवी उमेदवारांच्या शोधात आहे. या संदर्भात ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलं आहे. Dream 11 च्या मुंबई ऑफिससाठी ही भरती होणार असून यासाठी कंपनीचे पात्रता निकष तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहेत. त्याबद्दल जाणून घेवूया.

काय आहे शैक्षणिक पात्रता –

1. दोन वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अ‍ॅनॅलिटिकल अनुभव असावा.
2. सदर उमेदवाराकडे SQL मध्ये काम करण्याचा अनुभव असावा
3. गूगल अ‍ॅनॅलिटिक्स, लूकर, PowerBI व Tableau इत्यादी टूल्समध्ये यापूर्वी काम केलेलं असावे.
4. पायथॉनसारख्या स्टॅटिस्टिकल अ‍ॅनॅलिसिस लँग्वेजचा अनुभव असावा.

Dream 11 मध्ये जॉबसाठी पुढील स्टेप्स फॉलो करा –

1.अ‍ॅनॅलिटिकल सोल्युशनिंग स्कील्स वापरून मोठ्या प्रमाणावर वास्तविक बिझनेस प्रॉब्लेम्स सोडवणं.
2. डिझाईन आणि प्रयोगांचं विश्लेषण (A/B चाचण्या, सिंथेटिक नियंत्रण इत्यादी.) आणि उत्पादन वैशिष्ट्यांना प्राधान्य देण्यासाठी मदत करणं.
3. डेटाद्वारे युजर्सना इनसाइट्स देणे, युजर्सचं विभाजन, दीर्घकालीन ट्रेंड आणि वर्तणूक विश्लेषण करणे.
4. ऑर्गनायझेशनल स्ट्रॅटर्जी व प्रॉडक्ट रोडमॅप्ससाठी बिझनेस व प्रॉडक्ट टीमसोबत काम करणं.
5. SQL, Python इत्यादी टूल्सचा वापर करून योग्य मेट्रिक्स डिझाईन आणि इन्स्ट्रुमेंटेशनद्वारे बिझनेस हेल्थ डॅशबोर्ड तयार करणं.

Dream 11 मध्ये नोकरी करण्याची इच्छा असल्यास https://www.dream11.com/ ला भेट द्या. तुम्ही या नोकरीसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा या संदर्भात या वेबसाईटवर सविस्तर माहिती दिली असेल. मुख्य म्हणजे कंपनीच्या मुंबई ऑफिसमधून तुम्हाला काम करावं लागेल, असं कंपनीने आपल्या जाहिरातीत करताना म्हटलं आहे.