औरंगाबाद: देशभरात लसीकरण मोहीम सुरु आहे. अशात औरंगाबाद शहरातही अनेक लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु आहे. सध्या फक्य 44 वर्ष वयोगटावरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे.
सोबतच ड्राईव्ह इन लसीकरण प्रोझोन मॉल येथे मनपाने सुरु केले आहे. सोमवार पासून आज पर्यंत तब्ब्ल साठहुन अधिक नागरिकांचे लसीकरण झाले असून आज दुपार पर्यंत 4 नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
काय आहे ड्राईव्ह इन लसीकरण…
या लसीकरणात ज्या नागरिकाला लस घायची असेल त्याने केंद्रावर दुचाकी, रिक्षा, चारचाकी यातून यावे. सुरुवातीला केंद्रावर आपले नाव नोंदवावे आणि गाडीत बसलेले असताना लसीकरण करून परीक्षण क्षेत्रात अर्धातास बसावे. लसीकरण झालेल्या नागरिकाला काही त्रास जाणवला तर त्याच्यावर द्वारीत उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स तेथे उपस्थित आहेत. जर नागरिक लस घेऊन अर्ध्यातास बसल्या नंतर त्याला काही त्रास जाणवला नाही तर त्याला घरी जाता येईल. तेथील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार अद्याप कुढल्याच नागरिकांना लस घेतल्या नंतर कुठल्याही प्रकरचा त्रास जाणवला नाही
पहा संपूर्ण व्हिडिओ
https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/3209420696010949/