नीरा नदीच्या पुलावरून निघाला होता मालट्रक; महिला दुचाकीस्वाराने कट मारल्याने पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे आणि सातारा जिल्ह्याची हद्द असलेल्या नीरा नदीच्या पुलावरून खाली जाणारा ट्रक अडकल्याची घटना रविवारी घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मालट्रक नदीपात्रात न कोसळता कठड्यावरुन पदपथावर आला. या घटनेमुळे पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील वाहन चालकांचा व वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा नदीच्या पुलावर रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास लोणंद बाजूकडून मालवाहतूक करणारा ट्रक (एमएच 12 एचडी 0191) नीरा शहराकडे निघाला होता. यावेळी पाठीमागून आलेल्या एका महिला दुचाकीस्वाराने अचानक कट मारल्याने ट्रकचालकाने स्टेअरींग डाव्या बाजुला ओढले. या दरम्यान ट्रकचे पुढील बाजूचे डावेचाक रस्त्याचे कमी उंचीचे कठड्यावरून पदपथावर गेले.

ट्रकचे डावी बाजू पुलाच्या मोठ्या कठड्याला टेकणार तोच चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक मारल्याने पुढील अनर्थ टळला, अन्यथा ट्रक नदीत कोसळला असता. ट्रक चालकाने थांबवताच परिसरातील युवक चालकाच्या मदतीसाठी धावले. त्यांनी ट्रकचालकाला आधार देत कठड्यावरुन ट्रक पुन्हा रस्त्यावर आणला. यादरम्यान सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. पालखी मार्गावर नीरा बस स्थानकापर्यंत तर पाडेगाव ऊस संशोधन केंद्रापर्यंत व नगर मार्गावर बुवासाहेब चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.