चालत्या बसमध्ये चालकाला आला हृदयविकाराचा झटका; पुढे घडला थरारक प्रकार; Video Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद येथे घडलेल्या दुर्घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 40 हून अधिक प्रवासी असलेल्या सरकारी बसचा अपघात होताना दिसत आहे. ही बस थेट जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडते. परंतु या अपघातात कोणत्याही प्रवाशाला गंभीर हानी होत नाही. त्वरित बसवर नियंत्रण मिळवल्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांचा जीव वाचला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या घटनेचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ मागील सत्य

गाझियाबाद येथून कौशांबीकडे निघालेली बस मेरठ डेपोची होती. परंतु प्रवासादरम्यानच दिल्ली-मेरठ महामार्गावरील मसुरी जवळील नुरपूर अंडरपास येथे आल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. यामुळे बसमधील असलेल्या 20 प्रवाशांना दुखापत झाली. या सर्व प्रवाशांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर या सर्व घटनेची पोलिसांनी ताबडतोब कारवाई सुरू केली.

पोलिसांच्या तपासात आढळून आले की, दुर्घटनाग्रस्त बसच्या चालकाचे नाव प्रदीप कुमार असे आहे. बस घेऊन जात असताना चालक प्रदीप कुमारला हृदयविकाराचा झटका आला होता. ज्यामुळे बसचा अपघात झाला. परंतु प्रदीप कुमार यांनी अशा स्थितीत बसला रस्त्याच्या बाजूला आणले. ज्यामुळे प्रवाशांवर येणारे मोठे संकट टळले. सध्या या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी बसच्या अपघातात हा व्हिडिओ वेगवेगळ्या अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला लाखोंपेक्षा जास्त वेळ मिळाले आहेत.

दरम्यान, बसच्या अपघाताची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर काही वेळातच घटनास्थळी बचाव पथक आणि रुग्णवाहिका हजर झाल्या. यावेळी सर्वांच्या निदर्शनास आले की हृदयविकाराचा झटका आल्यामुळे चालकाच्या तोंडातून फेस येत आहे. त्यामुळे त्याला त्वरित रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर जखमी झालेल्या प्रवाशांना देखील रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. आता पोलीस या सर्व घटनेचा तपास करीत आहेत.