Driverless Car : अरे व्वा!! ड्रायव्हर शिवाय धावणारी टॅक्सी!! 364 रुपयांत सुरक्षित प्रवास

Driverless Car RoboTaxI
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Driverless Car मित्रानो, तंत्रज्ञानाच्या या जगात कधीबघायला काय बघायला मिळेल हे काही सांगता येत नाही. आत्तापर्यंत तुम्ही हवेत उडणारी टॅक्सी, ब्रिजवर उलटी धावणारी बस याबद्दल ऐकलं असेल…. पण तुम्हाला कोणी सांगितलं कि आता ड्रॉयव्हर शिवाय चालणारी कार पण आलीय, तर?? तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण आता हे सुद्धा शक्य झालं आहे. जगातील श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांनी हे करून दाखवलं आहे. एलोन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्लाने ड्रॉयव्हर शिवाय धावणारी टॅक्सी लाँच केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील ही एक नवीन क्रांतीच म्हणावी लागेल.

लोकांना करतेय आकर्षित – Driverless Car

एलोन मस्क (Elon Musk) यांनी स्वतः पोस्ट करून या ड्रायव्हर शिवाय धावणाऱ्या टॅक्सीबाबत (Driverless Car) माहिती दिली आहे. हि रोबोटॅक्सी सध्या ऑस्टिनमध्ये प्रवाशांच्या सेवेत अली आहे. पूर्ण सेल्फ-ड्रायव्हिंग (FSD) तंत्रज्ञानाचा वापर करून हि रोबोटॅक्सी बनवण्यात आली आहे. ऑस्टिनमधील अनेक ठिकाणी ही ड्रायव्हरलेस टॅक्सी धावताना दिसली. या टॅक्सितून प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना एका ट्रिप साठी ४.२० अमेरिकन डॉलर्स (सुमारे ३६४ रुपये) मोजावे लागतात. ड्रायव्हर शिवाय धावत असलेली हि टॅक्सी लोकांना आकर्षित करत आहे.

ड्रायव्हरशिवाय चालणारी टॅक्सी (Driverless Car) तयार करण्यासाठी टेस्ला ला यापूर्वीच मान्यता मिळाली होती. त्यानुसार, टेस्लाने त्यांच्या कार सिस्टममध्ये काही विशेष सेन्सर, कॅमेरे आणि हार्डवेअर वापरले आहेत. यामध्ये कॅमेरा, न्यूरल नेटवर्क आणि ऑटोपायलट हार्डवेअरचा वापर करण्यात आला आहे. एफएसडी सिस्टम या सर्वांसह एकत्रितपणे काम करते आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची गॅरेंटीही देते. नेव्हिगेशनसाठी टेस्ला रोबोटॅक्सीमध्ये एआय सिस्टम इन्स्टॉल करण्यात आली आहे. लेन बदलणे, वळणे घेणे, ट्रॅफिक लाइट्सवर थांबणे आणि पार्किंग स्पॉट्स ओळखणे या कामांसाठी एआयचा वापर करण्यात आला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवी क्रांतीच म्हणावी लागेल. भारतासारख्या शहरात तर कार प्रवास करताना सुरक्षिततेची चिंता जास्त जाणवते.. अशावेळी जर टेस्लाच्या या ड्रॉयव्हर लेस टॅक्सी तुन सुरक्षित प्रवासाचा रिजल्ट समोर आला तर भारतासह इतर देशातूनही या टॅक्सिसाठी मागणी वाढेल.