Driverless Metro : आता ड्रायव्हर शिवाय धावणार Metro; पहा कोणती टेक्नॉलॉजी वापरली?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Driverless Metro : सध्याचे जग हे तंत्रज्ञानाचे जग आहे. दररोज नवनवीन आणि अनोख्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत तुम्ही हवेत उडणारी कार, सेल्फ ड्रायव्हिंग कार बघितली असेल. पण आता लवकरच ड्रायव्हर शिवाय धावणारी ट्रेन आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. परंतु बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) ने कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) प्रणालीने सुसज्ज असलेल्या सहा ट्रेन कोचच्या पहिल्या संचाचे अनावरण केले आहे. या मेट्रो मध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

ड्रायव्हर शिवाय धावणारी हि मेट्रो (Driverless Metro) लाइन आरव्ही रोड आणि बोम्मासांद्रा याना जोडेल. हा पल्ला जवळपास 18.8 किमी लांबीचा आहे. या मेट्रोचा मार्ग बेंगळुरूच्या दक्षिणेला शहराच्या टेक हबशी जोडेल, जिथे Infosys, Tata Consultancy आणि Wipro सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. या मेट्रो ट्रेनमध्ये सीबीटीसी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सीबीटीसी ट्रेन टेलीपॅथीचा एक प्रकार म्हणून काम करते. सध्या या मेट्रोच्या सुरक्षिततेशी संबंधित टेस्टिंग सुरु आहे. CBTC च्या मदतीने दोन्ही ट्रेन एकमेकांशी योग्य असा समन्वय राखू शकतील. या टेक्नॉलॉजीमुळे दुसऱ्या ट्रेनच्या हालचाली समजतात.

कशी धावणार मेट्रो – Driverless Metro

एका वृत्तवाहिनीशी बोलताना बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र झा यांनी या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. जितेंद्र झा यांच्या मते, हे तंत्रज्ञान एका ट्रेनला दुसऱ्या ट्रेनशी एकप्रकारे संवाद साधण्यास सक्षम करते, ज्यामुळे अनअटेंडेड ट्रेन ऑपरेशन्स आणि ऑपरेशन कंट्रोल सेंटरमधून पुढे जाण्याचा मार्ग उपलब्ध होतो. रोज सकाळी ट्रेनला कंट्रोल सेंटरकडून वेक अप कमांड मिळेल. यामुळे ट्रेनमधील लाईट आणि इंजिन सुरू होईल. यानंतर हि ट्रेन स्वतःच आपण टेक्नॉंलॉजीने व्यवस्थित आहे का? काही प्रॉब्लेम नाही ना ते चेक करेल. प्लॅटफॉर्म जाण्यापूर्वी ट्रेन स्वतःच ऑटोमॅटिक वॉशिंग स्टेशनवर जाईल. ट्रेनच्या सर्व हालचालींमध्ये AI ची भूमिका महत्वपूर्ण आहे.