पुण्यातील हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हल्सला लागलेलया आगीच्या प्रकरणामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असताना आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या घटनेच्या तपासात समोर आले आहे की, चालक जनार्दन हंबर्डीकरने तिघांना ठार मारण्याच्या उद्देशाने गाडी जाळली होती. पण, त्याला जे मारायचे होते, ते जिवंत बचावले आणि चार निष्पाप लोकांचा बळी गेला.
मनातील असंतोष
चालकाच्या या भयंकर कृत्याचे कारण त्याच्या मनातील असंतोष आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या कबूलात सांगितले की, कंपनीतील वागणूक आणि सुसंस्कृततेचा अभाव यामुळे त्याच्या मनात राग वाढला होता. दिवाळी बोनससह पगार कापला गेला, त्याला एक चालक असून न चुकता कामे सांगितली जात होती, आणि मागील आठवड्यात तो जेवण घेऊ शकला नव्हता. या सर्व कारणांमुळे त्याला कंपनीतील तिघांवर राग होता. रागाचा बदला घेण्यासाठी त्याने आग लावली.
आगीत काय घडले?
घटनाप्रसंगी गाडीतील लोक झगडत होते. जळालेल्या लोखंडावर ओरखडे आणि गाडीच्या काचांवरही ओरखडे आढळले, ज्यामुळे ते शेवटच्या क्षणापर्यंत दरवाजा उघडण्याचा आणि बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. गाडीतील जळालेल्या चपलांपासून ते जळालेल्या फूड बॉक्सपर्यंत सगळं काही पुरावे म्हणून तेथेच दिसत होतं. गाडीतील धातूही वितळला होता.
मृतांची आणि जखमींची नावे:
मृत:
- सुभाष भोसले (वय 42)
- शंकर शिंदे (वय 60)
- गुरुदास लोकरे (वय 40)
- राजू चव्हाण (वय 40)
सर्व पुणे येथील रहिवासी.
जखमी
- प्रदीप राऊत
- प्रवीण निकम
- चंद्रकांत मलजीत
- संदीप शिंदे
- विश्वनाथ झोरी
- जनार्दन हंबार्डीकर (चालक)
या प्रकरणाने संपूर्ण परिसरात संताप निर्माण केला आहे. पोलिसांनी या घटनेवर गंभीरपणे तपास सुरू केला आहे.