देशभरातील 50 टक्के रेल्वे स्थानकांवर सुरू होणार औषधे केंद्रे; प्रवाशांना मिळेल त्वरीत उपचार सेवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रेल्वेने प्रवास करताना अनेकवेळा आपल्यावर काही औषधे घेण्यासाठी स्थानकाच्या बाहेर जाण्याची वेळ आली असेल. मात्र इथून पुढे आपल्याला कोणत्याही औषधांसाठी चालू प्रवासात स्थानकाच्या बाहेर जावे लागणार नाही. कारण की, सरकारने आता देशभरात ५० टक्के रेल्वे स्थानकांवर औषधे केंद्रे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ही औषधे केंद्रे रेल्वे स्थानकांवरच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रवासी सहजरित्या खाली उतरून आपल्याला हवी ती औषधे घेऊ शकतो. यामुळे प्रवाश्याला ट्रेन सुटण्याची देखील भीती वाटणार नाही.

महाराष्ट्रात लोकमान्य टिळक टर्मिनस, पिंपरी, मालाड, मनमाड, सोलापूर, नागभीड अशा सहा स्थानकांवर ही औषधी केंद्र उपलब्ध असणार आहेत. रेल्वेने दररोज कोट्यावधी प्रवासी प्रवास करत असतात. अनेक वेळा घरी औषधे विसरल्याच्या घटना या प्रवाशांसोबत घडतात. किंवा प्रवास करताना देखील त्रास होत असल्यामुळे त्यांना औषधांची गरज पडते. त्यामुळे अशा प्रवाशांना आरोग्याचा कोणताही त्रास होऊ नये, तसेच त्यांना वेळेत औषधी उपलब्ध व्हावी. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून राबवण्यात आलेल्या प्रकल्प अंतर्गत पहिल्या टप्प्यात देशभरात पन्नास टक्के स्थानकांवर जन औषधे केंद्र सुरू करण्यात येईल. या औषधी केंद्रांवर प्रवाशांना स्वस्त दरात आणि चांगल्या दर्जाची औषधे उपलब्ध करून दिले जातील. मुख्य म्हणजे, केंद्र सरकारकडून राबविण्यात आलेल्या या योजनेचा फायदा प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरच घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत लवकरच औषधी केंद्रांना आपली जागा तयार करून देण्यात येईल.

महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये काही व्यवसायिकांना देखील भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी प्रत्येक रेल्वे विभागाकडून विभागाकडून ई-लिलाव केला जाईल. यामार्फत रेल्वे विभागाला देखील महसूल प्राप्त होईल. केंद्र सरकारकडून राबवण्यात आलेल्या या योजनेची रचना अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनने केली आहे. या योजनेचा लाखो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रवाशाला त्रास होत असल्यास त्याला वेळेत औषधी उपचार मिळेल.