गुजरातमध्ये तब्बल 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त; समोर आलं पाकिस्तानी कनेक्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमधून तब्बल 2000 कोटींचे 3100 किलो ड्रग्ज जप्त (Drug Seized In Gujarat) करण्यात आले आहेत. गुजरातच्या कच्छमधून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून भारतीय उपखंडातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. जप्त केलेल्या ड्रग्जवर ‘Produce of Pakistan’ असे लिहण्यात आलं आहे. त्यामुळे यामागे पाकिस्तान असल्याचे स्पष्ट झालं आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गुजरात मध्ये यापूर्वी सुद्धा अनेकदा अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेले ड्रग्स इराणमधून आणले जात होते. ज्या बोटीतून हे ड्रग आले ती बोट दोन दिवस समुद्रातच होती. यानंतर भारतीय नौदलाने या संशयास्पद बोटची पाहणी केली असता जहाजातून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या कारवाईत बोटीतील 5 क्रू मेंबर्सना ताब्यात घेण्यात आले असून हे ५ जण पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. सदर आरोपीना पोरबंदर येथे नेण्यात आले आहे.

या जप्तीच्या कारवाईत 2000 कोटींचे 3100 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. या अमली पदार्थांमध्ये 2950 किलो चरस, 160 किलो मेथॅम्फेटामाइन, 25 किलो मॉर्फिनचा समावेश आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जप्त केलेल्या ड्रग्जवर ‘Produce of Pakistan’ असे लिहिले आहे. त्यामुळे यामागील पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे. उल्लेखनीय म्हणजे याआधीही भारतीय नौदलाने भारतीय सागरी हद्दीत अनेक वेळा कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. ड्रग माफिया सागरी मार्गाने भारतात अंमली पदार्थ घुसवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्रयत्न वेळोवेळी हणून पाडण्यात येत आहेत.