Dry Lemon Uses : सुकलेल्या लिंबाचा ‘असा’ करा वापर; काळी पडलेली भांडी होतील एकदम चकाचक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रात ऑनलाईन। (Dry Lemon Uses) उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरात आवर्जून लिंबू पहायला मिळतो. कारण या दिवसात लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. पण बऱ्याचदा इतर कामाच्या व्यापात आपल्याला घरात लिंबू आहेत याचा विसर पडतो. त्यामुळे होत काय? लिंबू सुकून जातात आणि टणक होतात. असे लिंबू काय वापरायचे? म्हणून आपण सर्रास ही लिंब उचलतो आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. तूम्हीहीह असेच करत असाल तर जरा थांबा. सुकलेल लिंबू फेकण्याआधी हा व्हिडीओ पहा. सुकलेल्या लिंबाचा असाही वापर होऊ शकतो हे पाहून तुम्ही थक्क व्हाल.

पहा व्हिडीओ(Dry Lemon Uses)

जर तुमच्याकडे सुकलेलं लिंबू असेल तर ते फेकून देऊ नका. या व्हायरल व्हिडिओत सांगितलेला जुगाड करून बघा. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, यामध्ये काही सुकलेली लिंब घ्या. (Dry Lemon Uses) या सुकलेल्या लिंबाच्या उभ्या फोडी कापून एका मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यानंतर यामध्ये ३ चमचे मीठ, १ चमचा बेकींग पावडर, २ चमचे व्हिनेगर आणि २ चमचे डिटर्जंट पावडर टाका. हे मिश्रण आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बारीक केलेली पेस्ट एका वाटीत काढून घ्या.

ही तयार पेस्ट कोणतेही भांडे लखलखीत स्वच्छ करण्यासाठी वापरा. अॅल्युमिनियम, पितळ, तांबे अशा विविध धातूंची भांडी घासण्यासाठी या पेस्टचा वापर करता येईल. (Dry Lemon Uses) व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही पेस्ट अगदी हलक्या हाताने भांड्यावर लावून घ्या. हळू हळू ही पेस्ट भांड्यावर घासा. असे केल्यास भांड्यावरील सर्व काळवटपणा निघून जाईल आणि तुमचे भांडे अगदी नवीन असल्यासारखे चमकू लागेल. ही पेस्ट एकापेक्षा जास्त दिवस साठवून तुम्हाला भांडी घासतेवेळी वापरता येईल.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डल diplakshmi123 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सुकलेले लिंबू फेकून देता तर थांबा..’. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला असून यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले आहे की, ‘लिंबू महाग आहे, त्यापेक्षा पितांबरी बरी’. (Dry Lemon Uses) तर आणखी एकाने लिहिले आहे, ‘एव्हढं कशाला करायचं? मी तर सरळ कुकरमध्ये असे लिंबू टाकून संपवते. यामुळे कुकरसुद्धा आतून चांगला स्वच्छ होतो’. तर अन्य एकाने लिहिलंय, ‘छान उपयोगी व्हिडीओ आहे. धन्यवाद ताई’.