बेळगाव : वृत्तसंस्था – मुलांनी वडिलांची हत्या (Murder) केल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. अशाच पद्धतीची एक बातमी बेळगाव येथील रबकवी बनहट्टी या तालुक्यातील उघडकीस आली आहे. राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या आश्रम योजनेतून घरकुल बांधण्यासाठी वडिलोपार्जित असलेली एक गुंठा जमीन देण्यास वडिलांनी नकार दिल्याने, स्वतःच्या पोटच्या पोरानेच वडिलांची हत्या (Murder) केली.
मृत व्यक्तीचे नाव मालप्पा हळूर असून वय 65 वर्षे तर मुलगा तूकापा हळूर वय 24 असे आरोपीचे नाव आहे. या बाबतीत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, ‘मालप्पा हळूर यांची रबकवी बनहट्टी शहरात दोन गुंठे जमीन आहे. मालपाच्या मुलाने म्हणजेच तुकाप्पाने त्यातील एक गुंठा जमीन आश्रम घर बांधण्यासाठी देण्यात यावी अशी वारंवार मागणी करत होता. मात्र या मागणीला वडिलांनी दुजोरा न दिल्याने याचाच राग डोक्यात ठेवून तुकाप्पाने काल (शुक्रवारी) दुपारी शेडमध्ये झोपलेल्या मालपाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या (Murder) केली.
या घटनेची माहिती मिळताच रबकवी बनहट्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या हत्येप्रकरणी (Murder) संशयित तुकप्पा हळूर याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबकवी बनहट्टी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!